सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणे हे ध्येय घेऊन सोलापूर सोशल फाऊंडेशन काम करत आहे हे आपण जाणताच. येत्या अक्षय्य तृतीयेला फाऊंडेशनच्या स्थापनेला ३ वर्षे पूर्ण होत आहेत. या दिवसाचे औचित्य साधून आम्ही एक अभिनव स्पर्धा आयोजित करत आहोत.
११ तालुक्यांनी बनलेला आपला सोलापूर जिल्हा म्हणजे धार्मिक, ऐतिहासिक, भौगोलिक, व्यावसायिक वैशिष्ट्यांची खाण आहे. पंढरपूरचा विठोबा किंवा सोलापूरचे सिद्धरामेश्वर, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ किंवा मोहोळचे नागनाथ महाराज. महती वर्णावी तेवढी कमीच! जगाला अग्निहोत्राचे देणगी देणारे शिवपुरी, ३३ संतांच्या सानिध्याने पावन झालेला व ज्वारीचे कोठार म्हणून परिचित मंगळवेढ़ा तालुका, दुष्काळी भाग असुनही डाळिंबाने समृद्ध असलेला सांगोला, प्राचीन भुलेश्वर मंदिर असलेले माळशिरस, मराठी भाषेतील पहिला शिलालेख म्हणून मानाने मिरवणारे हत्तरसंग कुडल अशी प्रत्येक तालुक्यामध्ये काही ना काही खास बाब असणारी कितीतरी स्थाने येथे आहेत. सोलापूरच्या खाद्य संस्कृती विषयी तर काय सांगावे! कडक भाकरी – शेंगा चटणी या जगप्रसिद्ध जोडी बरोबरच इथले अनेक वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ खवय्यांच्या मनात खास स्थान मिळवून आहेत. एकूणच सोलापूरच्या वेगवेगळ्या बाबतीत असणार्या खासीयती बद्दल बोलायचे तर त्यावर कितीही वेळ दिला कमी पडेल!
सोलापूर सोशल फाऊंडेशन मानते की ही सर्व सोलापूरची श्रीमंती आहे. मग या श्रीमंतीला जगापुढे काही वेगळ्या पद्धतीने मांडलं तर? हा विचार घेऊन आम्ही या स्पर्धेचं आयोजन केलं आहे.
निबंधस्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी आपल्या ‘सोलापूर जिल्हयाविषयी’ लेखन करावयाचे आहे व फोटो स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रसिद्ध ठिकाणे ( ऐतिहासिक / धार्मिक / सामाजिक किंवा इतर), प्रसिद्ध वस्तू, प्रसिद्ध व्यक्ती यांचे उत्कृष्ट फोटो काढून आम्हाला पाठवायचे आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क प्रा. डॉ. नरेंद्र काटीकर (स्पर्धा समन्वयक): संपर्क मो. नं. – 9422644246
सर्वोत्तम निबंध आणि फोटो यांना विशेष बक्षिसाने गौरविले जाईल.
बक्षिसे :
1️⃣ प्रथम क्रमांक : 5,000 रुपये /-
2️⃣ द्वितीय क्रमांक : 3,000 रुपये /-
3️⃣ तृतीय क्रमांक: 2,000 रुपये /-
4️⃣ उत्तेजनार्थ प्रथम : 1,000 रुपये /-
5️⃣ उत्तेजनार्थ द्वितीय : 1,000 रुपये /-
स्पर्धेचे सर्वसाधारण नियम:-
1. प्रत्येक स्पर्धकाची स्पर्धेच्या एका विभागात एकच प्रवेशिका स्वीकारली जाईल.
2. एक स्पर्धक निबंध व फोटो अशा दोन्ही विभागात स्वतंत्रपणे सहभागी होऊ शकतो.
3. स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुली आहे.
4. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
5. निबंधा/फोटो साठी आपल्या प्रवेशिका निबंध अथवा फोटो ह्या solapursocial2018@gmail.com ईमेल आयडीवर स्पर्धा जाहीर झालेल्या दिनांक 14 मे 2021 पासून अंतिम दिनांक 10 जून 2021 पर्यंत पाठवावयाच्या आहेत.
6. प्रवेशिका पाठवताना त्यामध्ये स्पर्धकाचे पूर्ण नाव, वय, पत्ता, मोबाईल नं. Email id नमूद केलेले असणे बंधनकारक आहे.
7. अपुरी माहिती असणार्या प्रवेशिका बाद केल्या जातील.
8. निबंध अथवा फोटो मध्ये कुठल्याही धार्मिक अथवा विवादास्पद गोष्टींचा अंतर्भाव आढळल्यास ती प्रवेशिका रद्द केली जाईल.
9.स्पर्धेचा निकाल यथायोग्य मान्यवर परीक्षकांच्या परीक्षणानंतर वैयक्तिक संपर्क तथा इतर सोशल माध्यमातून जाहीर प्रसिद्धीकरण केला जाईल.
10. प्रत्येक सहभागी स्पर्धकास डिजिटल सहभाग सर्टिफिकेट दिले जाईल.
अधिक माहितीसाठी संपर्क : प्रा.डॉ.नरेंद्र काटीकर(स्पर्धा समन्वयक): मो. नं. – 9422644246,
विजय पाटील, मुख्य समन्वयक, सोलापूर सोशल फाउंडेशन: मो. नं. – 9921710942
निबंध स्पर्धेसाठी नियम :
1. प्रत्येक स्पर्धकाने एकच निबंध पाठवावयाचा आहे.
2. निबंध हा मराठी भाषेमध्ये असला पाहिजे.
3. साधारणतः चार फुलस्केप पाठपोट एवढी पानांची संख्या मर्यादित राहील.
4. निबंध लेखन हे “ हस्तलिखितच ” हवे तसेच स्वच्छ सुलेखन मध्ये यथायोग्य व शुद्धलेखनाचे नियम पाळून करावयाचे आहे.
5. प्रवेशिकेसाठी जाणारे लेखन हे स्वतःच्या विचाराने केले असले पाहिजे. नंतर कुठल्याही प्रकारचा वाद / कॉपीराइट इत्यादी प्रश्न उद्भवल्यास स्पर्धक त्यास सर्वस्वी जबाबदार राहील.
6. निबंधासाठी आशयाची निवड, भाषा मूल्य, विविधता, वैचारिक मांडणी, ऐतिहासिक व वर्तमान तथा भविष्यातील निरीक्षणे / दाखले, उपाय, योजना, सूचना इत्यादीसह काही महत्त्वाच्या मुद्द्यांच्या आधारे परीक्षण केले जाईल.
फोटो स्पर्धेसाठी नियम :-
1. प्रत्येक स्पर्धकाने एकच फोटो पाठवावयाचा आहे.
2. फोटोसाठी विषयाची निवड, फोटोच्या अनुषंगाने तांत्रिक तपशील जसे की प्रकाश, क्लॅरिटी इत्यादी सह कलात्मकता व इतर बाबी या परीक्षणासाठी ध्यानात घेतल्या जातील.
3. प्रवेशिकेसाठी पाठविला जाणारा फोटो हा प्रत्यक्षरीत्या स्पर्धकानेच काढला असला पाहिजे. नंतर कुठल्याही प्रकारचा वाद / कॉपीराइट इत्यादी प्रश्न उद्भवल्यास स्पर्धक त्यास सर्वस्वी जबाबदार राहील.
4. स्पर्धकाने फोटो पाठवताना, संबंधित फोटो बाबत दोन ओळीत तपशील देणे आवश्यक आहे. उदा : फोटो नाव, दिनांक, ठिकाण इत्यादीबाबत.
अधिक माहितीसाठी संपर्क :
विपुल लावंड (समन्वयक) मो.7767080999
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…