सांगोला तालुक्यातील हळदहिवडी येथील शेतकरी अमोल बापुराव फाळके वय:25, धंदा: शेती यांची १७ महिन्याची मुलगी हि ५ जून रोजी सकाळी राहते घरामसोरून गायब झाली असल्याची माहिती मिळताच घरातील लोकानी तीचा आजुबाजुस वस्तीवर व पिकात शोध घेतला. त्यानंतर जमलेले नातेवार्इक हेही तीचा शोध घेत होते.मात्र जानवी कुठेही आढळून येत नसल्याने तिचे वडील अमोल फाळके हे मिसींग केस दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले.त्यावेळी त्यांना जानवी हि घरापासून १ किमी दूर असलेल्या चांगदेव तातोबा चव्हाण रा. हलदहीवडी यांच्या शेतातील पाण्याचे मोठे खडडयात आढळून आल्याची फोनवरून माहिती मिळाली.पोलीसांच्या मदतीने बापुराव बाळु लोखंडे यानी पाण्यात उतरुन प्रेत बाहेर काढले. त्यानंतर प्रेताची पाहणी केली असता तीच्या पाठीवर, डोळयाजवळ जखमा झाल्याचे दिसले त्यानंतर प्रेत सांगोला ग्रामीण रुग्णालयाकडे खाजगी वाहनातुन नेले.
सदर मयत जानवीचे वडील अमोल फाळके यांच्या वस्तीपासुन मुलीचे प्रेत मिळालेले चांगदेव तातोबा चव्हाण यांचे शेतातील पाण्याचा मोठा खड्डा हा सुमारे 1 किमी अंतरावर आहे. वस्तीपासुन सदर ठिकाणी जाणेकरीता असलेला रस्ता हा पायवाट असुन मागील दोन दिवसापासुन पाउस झाल्याने संपुर्ण चिखल झालेला आहे. जाताना पाय जमीनीत बुडत असल्याने मोठया माणसालाही चालत जाता येणार नाही असा रस्ता आहे, तसेच मयत मुलगी जान्हवी हीच्या दोन्ही डोळयात जन्मल्यापासुन टिकल्या असल्याने ती लांब एकटी कधीच जात नव्हती. असे असताना तीचे प्रेत वरीलप्रमाणे खड्डयात मिळुन आले. तीच्या पाठीवर 4 ते 5 ठिकाणी जखमा झाल्याचे व उजवे डोळयाजवळ लहान जखम झाली असल्याने तीला कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी उद्देशाने घरासमोरुन उचलुन नेवुन तीला पाठीवर डोळयाजवळ मारहाण करुन चांगदेव तातोबा चव्हाण यांच्या हलदहीवडी येथील शेतातील पाणी साचलेल्या मोठया खड्डयात टाकुन दिले असल्याचा संशय मुलीच्या पित्याने फिर्यादीत व्यक्त केला आहे.सदर खून हा शेतीच्या बांधाच्या व डाळींबाची १० रोपे जळाल्याच्या वादातून झाला आहे असे फिर्यादी अमोल फाळके यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले असून संशयित आरोपींची नावेही फिर्यादीत नमूद केली आहेत.