ताज्याघडामोडी

होळकर वाड्यात शिवराज्यभिषेक दिन साजरा

पंढरपूर / प्रतिनिधी येथील चंद्रभागेच्यातीरावर असणाऱ्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर वाडा याठिकाणी आज शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. होळकर ट्रस्टच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

होळकर वाड्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मुर्तीजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना करून त्यांची विधी होत शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पूजा करण्यात आली. त्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीचेही पूजन झाले. आणि शिवनामाचा जयघोष करण्यात आला. 

याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस, शाडो सहकारमंत्री दिलीपबापू धोत्रे, माजी नगराध्यक्ष नागेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष भास्कर कसगवडे,मनसे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शाम गोगाव,महेश म्हेत्रे, नागेश इंगोले, गणेश पिंपळणेरकर, दत्ता पवार,वैभव लिंगे, पांडुरंग ढोपे, संतोष सादिगले, अण्णा अभंगराव, सुभानराव घोडके, पुजारी चांदुकाका दंडवते,इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन होळकर ट्रस्टचे व्यवस्थापक माजी नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर यांनी केले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

1 day ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

5 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago