गुन्हे विश्व

धक्कादायक! सुनेने सासूचा गळा आवळून केला खून, ‘या’ प्रकारे झाला खुनाचा उलघडा

लातूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत सुनेनं आपल्या सासूचा खून केला आहे. धक्कादायक म्हणजे सुनेने आपल्या मुलाला हाताशी धरून सासूचा खून केला आहे. यामुळे गैरकृत्य करण्याला विरोध करणाऱ्या सासूला आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये सुनेने आणि नातवाने गळा आवळून ही हत्या केली आहे. या प्रकरणी निलंगा पोलिसांनी सून आणि नातवाला अटक केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण

हि घटना लातूर जिल्ह्यामधील निलंगा तालुक्यातील उमरगा हाडगा या गावामध्ये घडली आहे.

यामध्ये रुक्मिणबाई राजाराम माने यांना आपला जीव गमवावा लागला आहे. रुक्मिणबाई यांचा मुलगा शिवाजी याला आपल्या आईचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचा संशय आला. तेव्हा त्याने आपली पत्नी ललिता आणि मुलगा गणेश यांच्यावर संशय व्यक्त केला. शिवाजी हा शासकीय नोकरीला आहे. मात्र त्याची पत्नी त्याच्यापासून फारकत घेऊन बाजूलाच राहते. मात्र शिवाजी आपल्या आईबरोबर राहत होता. पत्नी वेगळी राहत असल्याने शिवाजी आपल्या पत्नीला पोटगी देतो. मात्र पोटगी मिळत असतानाही पत्नी ललिताने त्याच्या घरावर कब्जा केला होता.

मृत महिलेचा मुलगा शिवाजी हा दिवसभर कामावर असायचा. त्यावेळी पत्नी ललिता गैरकृत्य करायची आणि याच गैरकृत्यांना सासू रुक्मिणबाई विरोध करत होती. याचाच राग मनात धरून ललिताने आपला मुलगा गणेशला हाताशी घेतले आणि रुक्मिणबाई यांचा गळा आवळून खून केला. यानंतर सकाळी रुक्मिणबाई मृतवस्थेत घरात सापडल्या होत्या. रात्री व्यवस्थित असणाऱ्या आपल्या आईला काय झाले,असा प्रश्न शिवाजीला पडला होता. तेव्हा आपल्या आईचा खून झाल्याचा संशय शिवाजीला आला.तेव्हा त्याने निलंगा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार दाखल केली. यानंतर मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये हा अनैसर्गिक मृत्यू असल्याचे स्पष्ट झाले. मृत महिलेच्या मुलाने व्यक्त केलेल्या संशयामुळे पोलिसांनी शिवाजीची पत्नी ललिता आणि मुलगा गणेश यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबुल केला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

7 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

2 weeks ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago