सागर जिल्ह्यात एक हृदय हेलावणारी घटना घडली आहे. पतीचा मृत्यू डोळ्यासमोर बघणाऱ्या पत्नीनं देखील 35 दिवसांच्या आत आपलं जीवन संपवलं आहे. काही दिवसांपूर्वी पतीचा कारमध्ये जळून मृत्यू झाला होता. हेच दुख सहन न झाल्यानं पत्नीनं आपल्या वडिलांच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
35 दिवसांपूर्वी 32 वर्षीय रिजवाना खान हिच्या पतीचा मृत्यू झाला. कार दुर्घटनेत तो जिवंत जळाल्याची दुर्घटना घडली होती. पतीचं जाणं सहन न झाल्यानं रिजवानानं आपल्या वडिलांच्या घरी शाहगढ येथे आत्महत्या केली आहे.
रिजवानाला काही दिवसांपूर्वीच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता.
शुक्रवारी संध्याकाळी रिजवानाच्या घरातले तिच्या खोलीत गेले आणि तिला तयार होण्यास सांगितलं. मात्र खूप वेळ झाल्यानंतरही रिजवाना खोलीतून बाहेर आली नाही. कुटुंबियांनी तिला हाक मारली मात्र त्याला तिनं काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर घरातले सर्वजण तिच्या खोलीत गेले. तेव्हा रिजवाना आपल्या खोलीत पंख्याला लटकलेली दिसली. रिजवानानं गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून मृतदेह आता पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. घटनास्थळी सुसाईड नोट मिळाली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. सध्या पोलीस या आत्महत्येप्रकरणी अधिक तपास करत आहे.
रिझवानाचे वडील लियाकत खां यांनी पोलिसांना सांगितलं, सहा वर्षापूर्वी रिजवानाचं लग्न टीकमगढ येथील साजिद खान यांच्यासोबत झालं होतं. एक महिन्यापूर्वी साजिद आणि रिजवाना कारमधून घरी जात होते. तेव्हा कारचा अपघात झाला आणि कारनं अचानक पेट घेतला. यात साजिदचा जळून मृत्यू झाला तर रिजवाना गंभीर जखमी झाली. त्यानंतर रिजवाना बरेच दिवस रुग्णालयात होती. काही दिवसांपूर्वीच तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
पुढे रिजवानाचे वडील सांगतात, रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर तिला आम्ही शाहगढ येथे घेऊन आलो. डोळ्यासमोर पतीचा जळून मृत्यू झाल्यानं तिला मोठा धक्का बसला होता. रिजवाना पूर्णपणे खचून गेली होती. साजिदचा फोटो बघून ती दिवसभर रडत बसायची. तिला त्याचा मृत्यू होणं हे गोष्ट सहन झाली नाही. त्याच दुखात तिनं स्वतःचंही आयुष्य संपवलं.
30 एप्रिलला सागर जिल्ह्यातील साईखेडा ते लिधौरा या दरम्यान कारचं नियंत्रण सुटल आणि ती कार दुभाजकला जाऊन धडकली होती. कारमध्ये गॅसचं किट होती. मात्र ही धडक इतकी भीषण होती की, कारनं पेट घेतला. या अपघातात साजिद खान जिवंत जळाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. तर रिजवाना खान गंभीर जखमी झाली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…