पुणे – वारजे भागात एका बांधकाम ठेकेदारावर हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना शनिवारी घडली. बांधकाम ठेकेदार पळाल्याने बचावला. हल्लेखोरांनी त्याच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या. आर्थिक वाद किंवा पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
हल्लेखोर सीसीटिव्हीत टिपले गेले आहेत. हल्लेखोरांना पकडण्यासाठी स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेच्या पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. रवींद्र सखाराम तागुंदे (36 , रा. वारजे) असे बांधकाम ठेकेदाराचे नाव आहे.
तागुंदे याचे वारजे भागातील वंडर फ्युचरा इमारतीत कार्यालय आहे. तो बांधकाम ठेकेदार असून जमिन विक्रीचा व्यवसाय करतो.
शनिवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास तो कार्यालयात आला. त्यावेळी मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरून दोन दुचाकीवरून चौघे हल्लेखोर तागुंदेच्या कार्यालयासमोर आले. तागुंदे कार्यालयाबाहेर थांबला होता. त्यावेळी त्याच्याबरोबर कामगार होते. काही वेळानंतर कामगार तेथून गेले.
हल्लेखोरांनी तांगुदेच्या कार्यालयासमोर दुचाकी लावली. काही कळायच्या आत पिस्तुलातून दोन गोळ्या हल्लेखोरांनी तांगुदेच्या दिशेने झाडल्या. गोळीबार झाल्यानंतर तो घाबरला आणि पाठीमागील बाजूस असलेल्या टेकडीच्या दिशेने धावत सुटला.
हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग सुरू केला. हल्लेखोरांनी तागुंदेच्या दिशेने पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून बाह्यवळण मार्गावरून वारज्याच्या दिशेने पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी घटनास्थळी भेट दिली.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…