पंढरपूर (प्रतिनिधी):- गेल्या एक ते दीड वर्षापासुन संपुर्ण जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. एका भयंकर विषाणुमुळे सर्वकांही ठप्प झालेले आहे. इतर क्षेत्राप्रमाणेच याचा मोठा फटका शैक्षणिक क्षेत्रालाही बसला आहे. परंतु या काळात भावी पिढीच्या बुध्दीला चालना देण्यासाठी व त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर मित्र परिवार, पंढरपूर यांनी एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे.
रयतेचे राजे कुळवाडीभुषण छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य साधुन त्यांनी पंढरपूर शहरामधील विद्यार्थ्यांसाठी भव्य अशा ऑनलाईन चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे.
लॉकडाऊनमुळे कंटाळलेल्या विद्यार्थी मित्रांना या स्पर्धेच्या माध्यमातुन ही सुवर्णसंधी प्राप्त करुन दिल्याबद्दल श्रीनिवास उपळकर मित्र परिवाराचे विद्यार्थी व पालकांमधुन स्वागत होत आहे. ही स्पर्धा तीन गटात होणार आहे. इयत्ता 1 ली ते 4 थी पहिला गट, इयत्ता 5 वी ते 7 वी दुसरा गट तर इयत्ता 8 वी ते 10 वी तिसरा गट यानुसार ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रत्येक गटासाठी एकुण 4 बक्षिसे देण्यात येणार आहेत. या विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रं देण्यात येणार आहे.
*चित्रकला स्पर्धेसाठी तिन्ही गटासाठीचे विषय:
1) छत्रपती शिवाजी महाराज 2) कोरोनाबाबत जनजागृती
3) कोरोना योध्दा: ( पोलीस, पत्रकार, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, शेतकरी, सफाई कर्मचारी )
* इयत्ता पहिली ते 4 थी साठी निबंध स्पर्धेसाठीचे विषय:
1) छत्रपती शिवाजी महाराज 2) शाळेतले दिवस 3) आमचं कोरोनातलं बालपन
* इयत्ता 5 वी ते 7 वी साठी निबंध स्पर्धेसाठीचे विषय:
1) छत्रपती शिवाजी महाराज 2) परिक्षाच नसतील तर शिक्षण काय कामाचे ?
3) जगायच की शिकायच ?
* इयत्ता 8 वी ते 10 वी साठी निबंध स्पर्धेसाठीचे विषय:
1) छत्रपती शिवाजी महाराज. 2) आरोग्य क्षेत्रात शासनाने कोणत्या सुधारणा कराव्या लागतील?
3) कोरोना वॉरीयर्स यांचे योगदान.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची नोंदणी करायची आवश्यकता नाही. ज्यांना ज्यांना या स्पर्धेत सहभाग घ्यायचा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या घरीच वरील गटनिहाय विषय निवडून चित्रं काढायचे आहे किंवा निबंध लिहायचा आहे. यानंतर आपापल्या चित्राचा किंवा निबंधाचा ठळकपणे दिसेल असा योग्य क्वालिटीमधील फोटो काढुन खालील व्हॉटसअप नंबरवर पाठवायचे आहेत. वरील सर्व विषयावर सर्व विद्यार्थ्यांनी आपले फोटो दि. 6 जुन 2021 ते दि. 10 जून 2021 पर्यंत पाठवणे आवश्यक आहे.
*व्हॉटसअप क्रमांक: श्रीनिवास उपळकर- 7385850910, विशाल आर्वे- 9975346527, किरण मोहिते- 8263902993, उमेश वायचळ- 9970060563
चित्रकला स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून किरण मोहिते (प्रसिध्द व्यंगचित्रकार) तर निबंध स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून उमेश सासवडकर (प्रसिध्द लेखक व कवी) हे काम पाहतील. या स्पर्धेचा निकाल दि. 12 जून 2021 रोजी जाहीर करण्यात येईल. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.