कोरोना लसीचा डोस घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही.एम्सच्या टीमने एप्रिल आणि मे महिन्यात केलेल्या पाहणीत हे निष्कर्ष पुढे आले आहेत.या काळात कोरोनाची दुसरी लाट शिखरावर होती आणि दररोज जवळपास 4लाख नवे रुग्ण समोर येत होते. एम्सच्या स्टडीनुसार, ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले, त्यांना कोरोनाची लागण झाली मात्र कोरोनामुळे अशा लोकांना मृत्यू झाला नाही.या अभ्यासात म्हटलं गेलं, की लसीचे डोस घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. एम्सनं ब्रेक थ्रू इन्फेक्शनच्या तब्बल 63 प्रकरणांचा जीनोम सिक्वेंसिंगच्या माध्यमातून अभ्यास केला. यातील 36 रुग्णांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. तर, 27 जणांनी एक डोस घेतला होता. यातल्या 10 जणांनी कोविशील्ड लस घेतली होती. तर, 53 जणांनी कोव्हॅक्सिन घेतली होती. यातील कोणत्याही रुग्णाचा कोरोनाबाधित होऊनही मृत्यू झाला नाही.
या स्टडीमध्ये सहभागी असणाऱ्या व्यक्तींचं साधारण वय 37 वर्ष होतं. सर्वात कमी वयाचा व्यक्ती 21 वर्षाचा होता. तर, सर्वात वृद्ध व्यक्तीचं वय 92 वर्ष होतं. यात 41 पुरुष आणि 22 महिलांचा समावेश होता. कोणत्याही रुग्णाला आधीपासूनच कोणता गंभीर आजार नव्हता. लसीकरणाबाबत अजूनही लोकांमध्ये जागरुकता नाही. मात्र, कोरोनाच्या लशीपासून आपल्याला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. क्लिनिकल ट्रायलमध्येही लस सुरक्षित असल्याचं घोषित केलं गेलं आहे. त्यामुळे, कोरोनापासून बचावासाठी लस घेणं अत्यंत आवश्यक आहे.
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…
पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण…
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या…