जगभरात सर्वात जास्त वापरले जाणाऱ्या अॅप्सपैकी एक असलेले WhatsApp आपल्या युजर्ससाठी नेहमी नवीन-नवीन फीचर्स आणत असते. परंतू काही फिचर्स अद्यापही व्हाट्सअॅपवर उपलब्ध नाहीत. त्यामुळे युजर्सकडून त्याची वांरवार मागणी होत असते. यापैकीच एक फिचर म्हणजे एकच व्हाट्सअॅप नंबर अनेक फोन्समध्ये वापरता यावा अशी अनेकांची मागणी होती. युजर्सची ही गरज ओळखून व्हाट्सअॅप काम करत असून लवकरच Multi Device Support च्या माध्यमातून ही मागणी पूर्ण होत आहे. तसेच Disappearing Mode आणि View Once हे फीचर देखील WhatsApp मध्ये दिसणार आहेत. एकापेक्षा जास्त फोन्स वापरणाऱ्या लोकांसाठी हे फिचर वरदान ठरणार आहे.
व्हाट्सअॅपच्या या नव्या फीचर्सची माहिती WABetaInfo वेबसाइटच्या माध्यमातून समोर आली आहे. वेबसाइटने WhatsApp चे CEO Will Cathcart यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी आगामी फीचर्सची माहिती समोर आली. कंपनीच्या सीईओनी सांगितले कि, व्हाट्सअॅप Multi Device Support, Disappearing Mode आणि View Once हे फीचर लवकरच रोलआउट केले जातील. प्राप्त माहितीनुसार युजर त्यांचे व्हाट्सअॅप अकाउंट एकाचवेळी 4 फोन्समध्ये वापरू शकतील. यापूर्वी एका स्मार्टफोनमधील व्हाट्सअॅप नंबरने दुसऱ्या फोनमध्ये लॉगिन केल्यावर जुन्या फोनवरील अकॉउंट बंद होत असे.
तसेच डिसअपेरिंग फीचर अंतर्गत ठरविक वेळेत एखाद्या व्यक्तीला पाठवलेले मेसेजेस आपोआप गायब होतात. हे फीचर आता लवकरच व्हाट्सअॅप युजर्सना पण मिळणार आहे. तसेच व्हाट्सअॅप व्यू वन्स फीचर देखील लवकरच रोलआउट होणार आहे यात पाठवलेला फोटो किंवा व्हिडीओ मेसेज मिळवणारा व्यक्ती फक्त एकदाच बघू शकतो. त्यानंतर तो फोटो किंवा व्हिडीओ पुन्हा पाहता येत नाही. या फिचरविषयी अधिक माहिती समोर आली नाही.
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…
पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण…
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या…