गुन्हे विश्व

गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षकानेच केला महिला पोलिसावर अत्याचार, घरी जाऊन केलं धक्कादायक कृत्य

स्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपायावर मारहाण करून अत्याचार केल्या प्रकरणी वाशिम शहर पोलिसातील पोलीस निरीक्षकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी पोलीस निरीक्षक विश्वकांत गुट्टे हे नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्यांच्यावर वाशिम पोलिसांत विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान पोलीस निरीक्षकावर त्यांच्याच खात्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यावर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाल्यामुळे वाशिम पोलिसांत एकच खळबळ उडाली आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पोलीस ठाण्यात 2007 मध्ये विश्वकांत गुट्टे हे पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असतांना त्यांची सदर महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत ओळख झाली होती.

त्याच ओळखीचा फायदा घेत 30 मे 2021 रोजी वाशिम इथं विश्वकांत गुट्टे हे महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी आले असता त्यांनी जबरदस्ती करीत अत्याचार केल्याची तक्रार वाशिम शहर पोलिसांत दिल्यानं आरोपी विरुद्ध 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अल्का गायकवाड करीत आहेत.

आपल्याच खात्यातील एका कनिष्ठ महिला कर्मचाऱ्यावर अत्याचार करणाऱ्या पोलीस निरीक्षकावर कोणती कारवाई पोलीस विभाग करतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago