सानेन बकरीचे राज्यात पैदास केंद्र उभारणार
पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांची माहिती
पंढरपूर, दि. 05:- शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी शेळी व मेंढी पालन व्यवसायास चालना देणे आवश्यक आहे. यासाठी जगात जास्त दुध देणारी सानेन बकरीचे पैदास केंद्र महाराष्ट्रात उभारणाण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे राज्याचे पशुसंवर्धन , दुग्धविकास, क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी व मेंढी विकास प्रक्षेत्र, महुद ता.सांगोला येथे भेट देवून पाहणी केली दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.एन.ए.सोनवणे, प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.एस.एस.बोरकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी व मेंढी विकास प्रक्षेत्राचे संचालक डॉ.शशांक कांबळे, सहाय्यक आयुक्त डॉ.एस.एस.भिंगारे, तसेच परिसरातील शेळी, मेंढी पालक उपस्थित होते.
यावेळी श्री. केदार म्हणाले, शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी उच्च प्रतीच्या शेळया व मेंढयाची पैदास करुन देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी. पशुधन निरोगी रहावे, आजारी पशुधनाला जागेवरच उपचार मिळावेत यासाठी वैद्यकीय पथकासह फिरत्या पशुवैद्यकीय रुग्णालय सुरु करण्यात आली असल्याने शेतकऱ्यांना पशुधनावरील उपचाराची सुविधा दारातच मिळणार आहे.
मेंढीच्या माडग्याळ जातीचे वजन लवकर वाढत असल्याने जातीचे पैदास केंद्र उभारण्यासाठी आवश्यकती कार्यवाही करावी. विमा काढलेल्या पशुधनाच्या नुकसान भरपाई तात्काळ मिळेल याची दक्षता घ्यावी, अशा सूचनांही पशुसवंर्धन मंत्री केदार यांनी यावेळी दिल्या.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी व मेंढी विकास प्रक्षेत्राचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.कांबळे यांनी प्रकल्पातील शेळी, मेंढी पालन, वैद्यकीय सुविधा, चारा आदी सुविधेबाबत माहिती दिली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…