गुन्हे विश्व

तलवारीने बर्थडेचा केक ‘तो’ कापत होता अन् झालं असं काही की..

मित्रांसोबत वाढदिवस साजरा करताना, तलवारीने केक कापणे एका बर्थडे बॉयच्या चांगलेच महागात पडले आहे. तलवारीने केक कापणे आणि नाचगाणे सुरू असतानाच शहर पोलिसांनी एंट्री करत बर्थडे बॉयला बेड्या ठोकल्याची माहिती समोर आली आहे.

स्थानिक बाळापूर फैलातील सुदर्शन गेटजवळ रात्री उशिरा वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापला जात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. याआधारे शहर पोलीस घटनास्थळी धडकले असता, रोहन संजय बामनेट चार मित्रांसह वाढदिवस साजरा करताना दिसला.

पोलिसांना पाहून चौघांनी घटनास्थळावरून पळ काढला. रोहनला ताब्यात घेत पोलिसांनी त्याच्यासह चौघांविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५, भादंवि कलम १८८, २७९, २७०, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१(ब), साथरोग अधिनियम कलम ०३ आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

4 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago