माण तालुक्यातील दहिवडी येथील वनविभाग कर्मचाऱ्यांस केलेल्या कामाचे चेक ठेकेदारांस काढून देण्यापोटी लाच घेताना सापळा रचून अटक करण्यात आली आहे. वन विभागातील वनपाल सूर्यकांत यादवराव पोळ (वय ५७) असे लाच स्विकारणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी, सूर्यकांत यादवराव पोळ (वय ५७) याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून अटक केली.
तक्रारदार यांच्याकडून १० हजारांची लाच घेताना दहिवडी येथील वनपाल कार्यालयाजवळ पकडण्यात आले. दरम्यान, स्वीकारलेली लाचेची रक्कम मात्र मिळून आली नसल्याची माहिती एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी दिली.
वनपरिक्षेत्र अधिकारी, दहीवडी वन विभाग (ता. माण, जि. सातारा) येथील कर्मचारी सूर्यकांत पोळ याने शिंदी खुर्द येथील माती बंधान्याच्या कामाच्या बिलाचा चेक काढण्यासाठी पोट ठेकेदार यांच्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा येथे तक्रार दिली. त्यानुसार २ जून रोजी एसीबीने सापळा लावला. संशयित आरोपीने तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून ती स्वीकारुन पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने ती लाच रक्कम अज्ञातस्थळी फेकून दिली. एसीबीने ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे पैसे सापडले नाहीत. पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…