रिक्षाचालकांना आर्थिक मदत,जिल्ह्यातील 12 हजार 800 परवानाधारकांपैकी 6 हजार 199 अर्ज दाखल

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ॲटोरिक्षा परवानाधारकांना 1 हजार 500 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. हे अनुदान ॲटोरिक्षा परवानाधारकांच्याच बँक खात्यात ऑनलाईन जमा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ॲटोरिक्षा परवानाधारकांनी https://transport.maharashtra.gov.in या वेबसाईटवरून आपली माहिती कोणतीही कागदपत्रे न जोडता भरावी. जिल्ह्यात 12 हजार 800 ॲटोरिक्षा परवानाधारकांपैकी 3 जूनपर्यंत 6 हजार 199 अर्ज प्राप्त झाले असून उर्वरीत परवानाधारकांनी त्वरित अर्ज करण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी केले आहे.मात्र गेल्या महिनाभरापासून या योजनेचा लाभ घ्या असे आवाहन शासनाकडून करण्यात येत असताना सोलापूर जिल्ह्यातील 12 हजार 800 परवानाधारकांपैकी 6 हजार 199 अर्ज दाखल झाले आहेत.हातावरले पोट असलेले हे रिक्षा चालक हि मदत नाकारणे शक्य वाटत नाही.मात्र ऑनलाईन नोंदणीबाबत सर्व्हर डाऊन हा मोठा अडथळा ठरत असल्याचे मत अनेक रिक्षा चालक व्यक्त करताना दिसून येत आहेत.
राज्यासह सोलापूर जिल्ह्यातील ॲटोरिक्षा परवानाधारकांना आर्थिक मदत देण्यासाठी आयसीआयसीआय बँकेमार्फत कार्यप्रणाली विकसित केली आहे. https://transport.maharashtra.gov.in/…/Autorickshaw… या प्रणालीवर सहज अर्ज करता येतो. या प्रणालीत रिक्षा परवानाधारकाला स्वत:चे वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक, आधार क्रमांक याची नोंद करावी लागणार आहे. नोंद केलेली माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून खात्री करून घेतली जाणार आहे. त्यानंतर अर्ज हा अनुदान खात्यात जमा होण्यासाठी पुढील कार्यवाहीसाठी पाठविला जाणार येणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातून आतापर्यंत ऑनलाईन 1041 अर्ज प्रमाणित केले असून 317 नाकारले आहेत. उर्वरित अर्जावर त्वरित कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. ज्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी आणि मोबाईल क्रमांकाशी जुळतील, त्यांचे अनुदान त्वरित संबंधितांच्या खात्यावर जमा होणार आहे. ज्यांचे आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक बदलायचा असेल त्यांनी अनुज्ञप्ती विभाग, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर येथे केंद्र चालू केले असल्याचे त्यांनी सांगितले.
• नव्याने देण्यात आलेले किंवा 16 डिसेंबर 2015 नंतरचे नूतनीकरण झालेले जिल्ह्यातील सर्व ॲटोरिक्षा परवानाधारक अर्ज करू शकतील.
• अर्थसहाय प्राप्त करण्यासाठी आधारकार्ड आणि मोबाईल क्रमांक बँक अकाऊंटशी जोडलेला असणे गरजेचे आहे.
• कोणत्याही ऑनलाईन अर्जात बँक अकाऊंट नंबर विचारलेला नाही, अर्जदाराने तो कोणालाही देऊ नये.
• नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाद्वारे आपल्या अर्जाची स्थिती तपासू शकता.
परवानाधारक रिक्षा चालकाला अर्ज करताना अडचण आल्यास सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पोपट पाटील (8669250909) यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. Mh13@mahatranscom.in या ईमेल आयडीवर किंवा कार्यालयाच्या 0217-2303099 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. कार्यालयाकडून खाजगी व्यक्ती अथवा कोणत्याही दलालाची नेमणूक केली नाही. परवानाधारकांनी अनधिकृत व्यक्तीशी संपर्क करु नये, असेही आवाहन श्री. डोळे यांनी केले आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

18 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

18 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago