सासू आणि सुनेत वाद होतच असतात मात्र, जळगाव जिल्ह्यात अशी एक घटना उघडकीस आली आहे ज्यामुळे सर्वांनाच एक धक्का बसला आहे. सुनेने सासूची हत्या केल्याची धक्कादायक बुधवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडली असून या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात गजानन महाराज नगर भागात सुनेने सासूच्या डोक्यात आणि पाठीवर विळा मारला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सासूचा मृत्यू झाला आहे. द्वारकाबाई सोनवणे वय 75 असे हत्या करण्यात आलेल्या वृद्ध सासूचे नाव आहे.
भुसावळ शहरातील गजानन महाराज नगरमधील पद्माबाई विद्यालय येथे गेल्या 8 वर्षांपासून सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करणाऱ्या रविंद्र सोनवणे आणि त्यांचा परिवार राहत आहे. बुधवारी रवींद्र सोनवणे हा बाहेर गेलेला असताना सासू द्वारकाबाई आणि सुन उज्वला यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद इतका वाढला की सुनेने सासूची हत्या केली.
उज्वला रविंद्र सोनवणे यांचा आपल्या सासू द्वारकाबाई पंढरीनाथ सोनवणे यांच्यात वाद झाला तो विकोपास गेला. त्यात सुनेने धारदार शस्त्र विळ्याने सासू द्वारकाबाई सोनवणे यांच्या मानेवर वार करून हत्या केली.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे आणि प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी धाव घेतली. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…