गुन्हे विश्व

पुण्यातील गोल्डमॅन दत्ता फुगे हत्या प्रकरणातील आरोपीसह तिघांकडून तीन पिस्तुल जप्त

पुण्यातील गोल्डमॅन दत्ता फुगे हत्या प्रकरणातील आरोपीसह तिघांकडून तीन पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. आरोपीकडून तीन पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात पिंपरी चिंचवडमधील भोसरी पोलिसांना यश आले आहे. पुण्यातील गोल्डमॅन दत्ता फुगे यांची जुलै 2016 मध्ये दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती. यामुळे पुण्यासह राज्यभरात एकच खळबळ उडाली होती.

तीन पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त

गोल्डमॅन दत्ता फुगे हत्या प्रकरणात प्रमोद उर्फ कक्काल धोलपुरिया आणि त्याचे साथीदार प्रसन्ना उर्फ सोनू ज्ञानेश्वर पवार, अंकुश डांगले अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी गणेश सावंत यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपींना सापळा लावून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 93 हजार 400 रुपये किंमतीचे तीन पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

जुलै 2016 मध्ये फुगेंची हत्या

सोन्याचा शर्ट परिधान करत असल्यामुळे चर्चेत आलेल्या दत्ता फुगे यांची 15 जुलै 2016 रोजी हत्या करण्यात आली होती. पुण्यात दिघी येथील भारतमाता नगर परिसरात हा प्रकार घडला होता. पद्धतशीरपणे कट रचून फुगे यांची हत्या करण्यात आल्याचे त्यांचा मुलगा शुभमने सांगितले होते. विशेष म्हणजे दत्ता फुगे यांचा मुलगा शुभमच या प्रकरणात महत्त्वाचा साक्षीदारही आहे. त्यांची पत्नी सीमा फुगे या माजी नगरसेविका आहेत.

सोन्याचे दागिने घालण्याच्या हौसेमुळे प्रसिद्ध

अंगावर सोन्याचे दागिने घालण्याच्या हौसेमुळे ते पिंपरीचे गोल्डमॅन म्हणून ओळखले जात होते. सुमारे साडेतीन किलो सोन्याचा शर्ट बनवून विश्वविक्रम नोंदवल्याने ते प्रसिद्धी झोतात आले होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

4 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago