कर्जत येथील महसूल विभागाच्या पथकाने घुमरी येथील सीना नदीच्यापात्रात अवैध वाळू उपसा करणारे दोन ट्रॅक्टर पकडले.मात्र या कारवाईत तलाठ्याला शिवीगाळ व धक्काबुक्की करून ट्रॅक्टर पळवून नेल्याचा प्रकार घडला. याबाबत अधिक माहिती अशी कि,अवैध वाळू उपसा कारवाई केलेले दोन्ही ट्रॅक्टर कर्जत येथे आणत असताना ट्रॅक्टर चालक सचिन अनभुले याने आपल्या मोबाईलवरून अज्ञात व्यक्तीला फोन करून बोलावून घेतले.
यावेळी चालक सचिन अनभुले याने तलाठी धुळाजी केसकर यांना शिवीगाळ करत ट्रॅक्टरमधून ढकलून दिले.
त्या इसमाने तलाठी केसकर यांना पकडुन ठेवत त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर वाळूने भरलेल्या ट्रॉलीसह आष्टी तालुक्याच्या हद्दीत पळवून नेला.
याप्रकरणी घुमरी येथील सचिन महादेव अनभुले तसेच पळून गेलेल्या एकाविरुद्ध कर्जत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तलाठी धुळाजी केसकर यांनी ही फिर्याद दिली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…