ताज्याघडामोडी

फडणवीसांच्या भेटीनंतर एकनाथ खडसे पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण

मुंबई, 02 जून: माजी महसूल मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओके येथे जाऊन भेट घेतली. एक दिवसाआधीच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुक्ताईनगरचा दौरा केला होता. त्यानंतर आज खडसे पवारांच्या भेटीला पोहोचल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

एकनाथ खडसे यांनी आज सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवास्थानी जाऊन भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती, शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली त्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होते, असे खडसे यांनी सांगितलं. तसंच,  यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सांमत हे सुद्धा उपस्थितीत होते.

विशेष म्हणजे, भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सिल्व्हर ओक बंगल्यावर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात आले होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीस हे जळगावच्या दौऱ्यावर गेले होते.

मुक्ताईनगरमध्ये जाऊन त्यांनी खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे  वेगवेगळे राजकीय तर्कवितर्क लढवले जात होते. त्यानंतर आज सकाळी एकनाथ खडसे हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले होते.  त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago