चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा खून केला आहे. नंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. उषा योगेश गायकवाड (वय 28) आणि योगेश तानाजी गायकवाड (वय 33) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब टापरे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उषा आणि योगेश यांचा 13 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना 10 आणि 8 वर्षाची दोन मुले आहेत. उषा घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवात होती. योगेश काहीही काम नसल्यामुळे घरीच बसून होता. दरम्यान, योगेश हा सारखा पत्नी उषाच्या चारित्र्यवर संशय घ्यायचा. यामुळे त्यांच्यात सतत वाद होत होते.
सोमवारी रात्री त्यांच्यात याच कारणावरून वाद झाले. रात्री मुले झोपल्यानंतर योगेश गायकवाड यांनी गळा आवळून पत्नीचा खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी मुले जेव्हा झोपेतून उठली तेव्हा त्यांना वडील छताला लटकलेल्या अवस्थेत दिसले तसेच आई निपचित पडली होती. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चंदननगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…