एका विवाहित प्रियकराने आपल्या प्रेयसीचं अपहरण करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी प्रियकराने हत्या केल्यानंतर प्रेयसीचा मृतदेह एका कालव्यात फेकून दिला होता. मृत तरुणी घरातून गायब झाल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला. त्यानंतर गुन्ह्याची तपासणी करत असताना, पोलिसांनी हत्येच गूढ उलगडलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली असून त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
संबंधित घटना उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर याठिकाणी घडली आहे. येथील 24 वर्षीय तरुणी तबस्सुमच मागील काही दिवसांपासून तैमूर नावाच्या एका विवाहित युवकाशी प्रेमसंबंध सुरू होते. आपला प्रियकर विवाहित असूनही प्रेयसी तबस्सुम तैमूरवर लग्नासाठी दबाब आणत होती. यामुळे मृत तबस्सुम आणि तैमूर यांच्या सातत्याने खटके उडत होते. यातूनच प्रेयसीच्या सततच्या त्रासाला कंटाळून प्रियकर तैमूरने तबस्सुमचं अपहरण केलं. एका अज्ञात स्थळी नेवून तिची निर्घृण हत्या केली. यानंतर आरोपीने तबस्सुमचा मृतदेह एका कालव्यात फेकून दिला.
दुसरीकडे, आपली मुलगी घरी आली नाही, म्हणून मृताच्या कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली. याप्रकरणी पोलीस तपास करत असताना पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले. तिचं तैमूर नावाच्या विवाहित युवकाशी प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी तैमूरला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. यावेळी पोलिसांनी तबस्सुमबाबत विचारणा केली. सुरुवातीला तैमूरने उडवाउडवीची उत्तर द्यायला सुरूवात केली.
यानंतर पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताचं त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याचबरोबर तबस्सुमचा मृतदेह एका कालव्यात फेकल्याची माहितीही त्याने दिली. यानंतर पोलिसांनी तबस्सुमचा मृतदेह शोधून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. संबंधित हत्या लग्नाचा तगादा लावल्यामुळे केली असल्याची माहिती आरोपी प्रियकराने पोलिसांना दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…