छिंदवाडात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कोरोनावर मात करून घरी परतलेल्या महिलेला तिच्या पती आणि मुलीनं मारहाण केली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोरोनाशी दोन हात करून १७ दिवसांनी घरी परतलेल्या महिलेचा पती आणि मुलीशी वाद झाला. प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचलं.
छिंदवाडातील हॉटेल जे. पी. इनच्या मागील परिसरात राहणाऱ्या शोभना पटौरिया यांचा कोरोना अहवाल मे महिन्यात पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर गेल्या १७ दिवसांपासून एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
कोरोनावर मात करुन त्या घरी परतल्या. यानंतर त्यांचा पती संजय पटौरिया आणि मुलगी वंशिका पटौरिया यांच्यासोबत उपचारांसाठी झालेल्या खर्चावरून वाद झाला.
पती आणि मुलीनं आपल्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप शोभना यांनी केला. आपला जीव वाचवून शोभना तिथून पळून गेल्या. कोरोनातून नुकत्याच बऱ्या झालेल्या शोभना यांनी उपचार घेतले. त्यानंतर त्या ऑक्सिजन मास्क लावून पोलीस ठाण्यात पोहोचल्या. तिथे त्यांनी पती आणि मुलीविरोधात तक्रार दाखल केली.
पती आणि मुलीनं चाकूनं जीवघेणा हल्ला केल्याचं शोभना यांनी पोलिसांना सांगितलं. ‘मी कोरोनातून नुकतीच बरी झाले आहे. १६ ते १७ दिवसांनंतर मी घरी गेले होते. त्यावेळी पती आणि मुलीनं उपचारांवर झालेल्या खर्चावरून वाद घातला. पती आणि मुलीनं माझ्यावर चाकूनं हल्ला केला. मी तिथून कशीबशी निसटले,’ असा जबाब शोभना यांनी नोंदवला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…