नागपूर : असं म्हणतात की आई ही आपल्या मुलांसाठी जीवाचं रान करते. तिच्या मायेला सीमा नसल्याचे सांगितले जाते. मात्र, नागपुरात एक विचित्र प्रकार घडला आहे. आपल्या सात महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला एका आईने रागाच्या भरात जबर मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्वांचा थरकाप उडालाय. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. नागपूर पोलिसांनीसुद्धा या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
किरण मसराम असं लहान बाळाला मारहाण करणाऱ्या माहिलेचं नाव आहे. व्हिडीओमध्ये ही महिला आपल्या सासूसोबत घरगुती वादातून भांडत करताना दिसतेय. यावेळी राग अनावर झाल्यामुळे ही महिला आपल्या पोटच्या सात महिन्यांचा बाळाला चक्क मारहाण करते आहे. तसं व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसतंय.
पोलिसांकडून गंभीर दखल, गुन्हा दाखल
ही घटना समाजमाध्यमावर येताच त्याची गंभीर दखल नागपूर पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांनी महिलेकडे जाऊन सर्वात आधी बाळाला ताब्यात घेऊन सुरक्षित केलंय. त्यानंतर पोलीस आणि एनजीओच्या मदतीने या महिलेचं काऊन्सलिंग करण्यात आलंय. दरम्यान, या प्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
कल्याणमध्ये वॉचमनला अमानुषपणे मारहाण
सोसायटीचा गेट उघडण्यास उशीर झाला या कारणावरुन एका तरुणाने वॉचमनला बुलेटच्या चैनने बेदम मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये 29 मे रोजी घडली होती. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी स्टॅली जॉर्ज नावाच्या या तरुणावर कारवाई केली आहे. मात्र, आरोपीने अशाप्रकारे निर्दयी वागणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांकडून देण्यात आली. तसेच ही घटना घडल्यानंतर सोसायटीतील नागरिकांची देखील तशीच भावना होती.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…