ताज्याघडामोडी

राष्ट्रवादी पक्षाचे युवा नेते भगिरथ भालके यांच्या वतीने पंढरपूर नगरपरिषदेला निवेदन

राष्ट्रवादी पक्षाचे युवा नेते भगिरथ भालके यांच्या वतीने
पंढरपूर नगरपरिषदेला निवेदन
पंढरपूर दि.31 ः आज दि.31.05.2021 रोजी पंढरपूर राष्ट्रवादी पक्षाचे नेते श्री भगिरथदादा भालके यांच्या वतीने पंढरपूर नगरपरिषद, पंढरपूर यांना कोरोना या महामारीच्या काळामध्ये पंढरपूर शहरातील नागरिकांच्या मागण्या मान्य करणेसाठी पार्टीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे समवेत निवेदन देण्यात आले.
यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री मानोरकर यांनी रूग्ण-शव वाहिका व शहरातील व्यापार्‍यांच्या गाळ्यांचे भाडे व नागरिकांचा कर माफीचा प्रस्ताव तात्काळ आयुक्ताकडे देण्याचे कबुल करून त्याची प्रत श्री भगिरथ भालके यांना देण्याचे कबुल केले. सोबत निवेदन जोडले आहे. तसेच 65 एकर येथील हॉस्पिटल मध्ये 50 टक्के बेड नगरपालिकेचे कर्मचारी व त्यांचे कुटूंबिय शहरातील दारिद्—य रेषेखालील गोर-गरिब नकागरिकांना राखीव ठेवण्याचा ठरावही घेण्याचे आश्वासन दिले.
यावेळी श्री भगिरथदादा यांनी मुख्याधिकारी श्री अनिकेत मानोरकर यांना सांगितले की, पंढरपूर शहराच्या विकासासाठी शासनाकडून मोठ्याप्रमाणात निधी आणण्याचे आश्वासन देऊन नगरपालिकेची कोण-कोणती कामे प्रलंबित आहेत त्याची प्रत माझ्याकडे द्या कोणतेही राजकारण न आणता मी ती सर्व कामे मुख्यमंत्री मा.ना.श्री उध्दव ठाकरे साहेब व उपमुख्यमंत्री मा.श्री ना.अजितदादा पवार साहेब यांचेकडून मार्गी लावतो असेही दादांनी आश्वासन दिले.
सदर वेळी सर्व नगरसेवक सर्वश्री विरोधी पक्ष नेते सुधीर धोत्रे, प्रशांत शिंदे, सुरेश नेहतराव, लखन चौगुले, महादेव धोत्रे व सर्वश्री किरणराज घाडगे, सुधीर धुमाळ, अनिल अभंगराव, महंमद उस्ताद, नागेश गंगेकर, सतीश शिंदे, आप्पा राऊत, संजय बंदपट्टे, स्वागत कदम, संदीप मांडवे, श्रीकांत शिंदे, सतीशबापू घंटे, सुमित शिंदे, शंकर सुरवसे, सागर पडगळ, संतोष बंडगर, स्वप्निल जगताप, तानाजी मोरे, दादा थिटे, सुरज पावले, राजाभाऊ भोसले यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

3 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago