गुन्हे विश्व

डॉक्टर दांम्पत्याचा दिवसाढवळ्या गोळ्याघालून खून, घटनेचा थरार सीसीटिव्हीत कैद

भरतपूर येथे दिवसाढवळ्या एका डॉक्टर दांम्पत्याचा गोळीबार करून हत्या करण्यात आली आहे. हा प्रकार शहरातील हिरदास बस स्थानकाजवळी भर चौकात घडला असून दुचाकीवरुन दोघांनी येऊन डॉक्टर दांम्पत्यावर भरदिवसा गोळ्या घालून हत्या केली व आरोपी फरार झाले. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी 4.45 वाजता घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

दुचाकीवरील या दोघांनी सुरुवातीला या दांम्पत्यास एका क्रांसिंगवर ओवरटेक केेले. त्यांनतर पायी चालत ते डॉक्टर दांम्पत्याजवळ आले.

कारमधील डॉक्टरच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी कारचा दरवाजा बंद करण्याचा प्रर्यंत केला मात्र तेवढ्यातच या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला व घटनास्थळावरुन पळ काढला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार हा खून बदलेच्या भावनेतून झाला असावा. हे दांम्पत्य एका युवतीच्या हत्येमध्ये सहभागी होते. याचा संबध डॉक्टर सोबत होता. गोळीबार करणारा आरोपी हा त्या महिलेचा भाऊ असल्याची पोलिसांना ओळख पटली आहे. या महिलेची हत्या दोन वर्षापुर्वी झाली असून यामध्ये डॉक्चरची पत्नी व आई ह्या आरोपी आहेत.

भाजप नेते राज्यवर्धन राठोड यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करुन अशोक गहलोत यांच्या नेतृत्वात राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढविला आहे. ते म्हणाले की, ‘राजस्थानात एका डॉक्टर दांपत्याला गोळ्या घालून ठार मारले गेले. राजस्थानमध्ये अशाप्रकारची बेभानपणाची स्थिती राज्य सरकारच्या अखत्यारीतून आली आहे. आमच्या शहरांमध्ये व खेड्यात शांतता करण्यासाठी व गुन्हेगारांना रोखण्यासाठी त्यांनी काहीही केले नाही.’

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

1 day ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

1 day ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago