पिंपरी चिंचवड परिसरात एका दुचाकीस्वाराने वाहतूक विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्याला रस्त्यावरून फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला असून पोलीसांनी आरोपी युवकाला अटक केली आहे. संबंधित जखमी पोलिसाने आरोपीची दुचाकी अडवून त्याच्याकडे कागदपत्रे आणि लायसन्सची विचारणा केली असता. आरोपीने वाहतूक पोलिसाला धक्का देऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला पकडण्यासाठी मागे धावलेल्या पोलीसालाच आरोपीनं फरफटत नेलं आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
संबंधित घटना पिंपरी चिंचवड परिसरात घडली आहे. येथील एका नाकाबंदी पॉईंटवर हिंजवडी वाहतूक विभागाचे हवालदार शंकर इंगळे ड्युटीवर होते. यावेळी संजय शेडगे नावाचा व्यक्ती समोरून आला. पोलीस हवालदार इंगळे यांनी त्याला थांबवून त्याच्याकडे लायसन आणि इतर कागदपत्रांची विचारणा केली. यावेळी लायसन आणि कागदपत्रे दाखवण्याऐवजी आरोपी शेडगे यानं इंगळे यांच्यासोबत हुज्जत घालायला सुरुवात केली. यानंतर त्याने इंगळे यांना धक्का देऊन दुचाकीवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…