आदेशाची प्रत सोपवल्यानंतरच भीमा नगरचे १८ दिवसाचे धरणे आंदोलन मागे

भिमानगर येथे उजनी धरणाच्या गेटवरती गेल्या १८ दिवसापासून जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेले आंदोलन उजनी धरणाचे 5TMC पाणी बेकायदेशीररित्या शासनाने मंजूर केले होते ते रद्द केल्याचे लेखी आदेश शासनाने देऊन सुध्दा संबधित कार्यकारी अभियंता मोरे हे मला वरिष्ठ पातळीवरुन अजुन आदेश आले नाहीत अशी उडवाउडवीची उत्तरे देत होते अखेर जनहितच्या महिला अध्यक्षा स्वातीताई पाटील,मोहोळ पं.स.मा.उपसभापती साधना देशमुख व ईतर महिला यांनी  साहेब यांनी कार्यकारी अभियंता यांना घेराव घालुन लेखी पत्र द्या अन्यथा तुम्हाला  कार्यालयाबाहेर जाऊ देणार नाही असा खणखणीत ईशारा देताच प्रशासन जागे झाले व कार्यकारिणी अभियंता यांनी उजनी गेटच्या आंदोलनस्थळी येऊन प्रभाकर भैय्या देशमुख, सचिन जगताप,दत्ता व्यवहारे, सुहास पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अधिकृत पत्र देऊन आंदोलन थांबविण्याची विनंती केली व आंदोलन मागे घेतले असल्याचे देशमुख यांनी सांगितले.मात्र आंदोलनास परवानगी नसतानाही गेल्या १८ दिवसापासून धरणे आंदोलन करीत आदेशाचा भंग केल्याच्या आरोपाखाली भादंवि कलम १८८,२६९,२७०,१४३ अंतर्गत जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप,दत्तात्रय व्यवहारे,माऊली जवळेकर,विठ्ठल मस्के,प्रतापसिह चंदनकर आदी आंदोलकावर टेम्भूर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        

यावेळी भिमानगर व ईतर  गावोगावच्या शेतक-यांनी आंदोलनस्थळी आंदोलनकर्त्यांचे हार-फेटे बांधून सत्कार करुन आभार मानले यावेळी आंदोलनकर्त्यांनी ज्या ज्या ग्रामपंचायतीनी पाठींबा दिला त्यांचे,आंदोलनस्थळी भेट देणा-या सामाजिक-राजकीय नेत्यांचे पत्रकार बांधवांचे व आंदोलनास विशेष सहकार्य करणा-या बाळासो पाटील व कुंटुबियाचे आभार मानले. आंदोलन संपताच टेंभुर्णी पोलीसांनी आदोलनकर्त्याची धरपकड केली व अटक करुन पोलिस स्टेशनला आणुन गुन्हे दाखल केले व रात्री उशीरा सुटका केली.

यावेळी प्रहारचे अमोल जगदाळे,बळीराजाचे माऊली जवळेकर, स्वाभिमानीचे शहाजहान शेख,किसान क्रांतीचे प्रताप चंदनकर, रांझणीचे मा.सरपंच नारायण गायकवाड,अकोले बु!! चे सरपंच सतीश आबा सुर्वे, उपसरपंच बशीर मुलाणी, ग्रां.प.सदस्य कल्याण नवले,रमेश पवार,तुषार पाटील,सुजीत दरगुडे,बाबा चव्हाण,चंद्रकांत निकम,नाना मोरे, विकास जाधव,रयतचे अण्णा जाधव,बळीराम गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे सचिन पराडे पाटील,नाना नगरे,महावीर भोई,रामदास खराडे,मल्हारी गवळी,प्रंशात महाडिक,धवल पाटील,मंगेश वाघ,दादासो गायकवाड, अतुल भालेराव, अंकुश महाडिक,सचिन गायकवाड, सिध्दार्थ भास्कर, दत्ता आरकिले विजयराजे खराडे, संजय नवले,श्रीराम महाडिक, सौरभ आरकिले, ओंकार औताडे,अमोल पाटील, शंभूराजे देशमुख ई. 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago