गेल्या दीड महिन्यापासून पंढरपुर शहरात कडक लॉकडाऊन ची अंमलबजावणी होत असतानाच शहरात मोटार सायकल चोरीच्या घटनात मात्र वाढ झाल्याचे दिसून येत आहे.पंढरपुर शहरातील रस्ते सामसूम असल्याचा फायदा उठवत चोरटे आपला कार्यभाग साधत असून पंढरपुर शहरातील मनीषा नगर येथील ट्रान्सपोर्ट व्यवसायिक सौरभ विक्रम दाते हे कुटूंबासहीत पुणे येथे गेले असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचे कडीकोयंडे तोडून घरात प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे.
या बाबत पंढरपुर शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पंढरपुर शहरातील मनीषा नगर परिसरात फिर्यादी सौरभ विक्रम दाते हे कुटूंबासह राहतात.त्यांचा ट्रान्सपोर्ट चा व्यवसाय असून या निमित्ताने त्यांना वारंवार बाहेर गावी जावे लागते.फिर्यादी आणि त्यांचे कुटूंबीय हे पुणे येथे गेले असता २७ मे रोजी त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या महिलेचा त्यांना फोन आला व घराच्या आवारात लावलेली दुचाकी आढळून येत नसल्याचे सांगितले.सदर माहिती मिळताच फिर्यादीने फोन करून गोपाळपूर येथील शेतातील आपल्या कामगारास घरी जाऊन माहिती घेण्यास सांगितले असता त्याने घरी जाऊन पाहणी केली. त्यावेळी आवारातील एक मोटार सायकल गायब असून घराचे दारही उघडे असल्याचे सांगितले.हि माहिती मिळताच फिर्यादी हे कुटूंबासहित पंढपुरात आले असता त्यांना सर्व कपाटे उघडी दिसली तसेच साहित्य कपडे अस्ताव्यस्थ पडलेल दिसले व घराचा मागील दरवाजा उघडा दिसला.
या प्रकरणी फिर्यादी सौरभ विक्रम दाते रा.मनिषानगर पंढरपूर यांनी पंढरपुर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.