गुन्हे विश्व

सासरच्या दारातच केला लेकीचा अंत्यसंस्कार, छळ करून विष पाजून मारल्याचा संशय

लेकीचा मृत्यू झाल्यानंतर सासरच्या दारामध्येच तिच्या पार्थिवावर माहेरच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केले. बारामती तालुक्याच्या सांगवी या गावात हा प्रकार घडला. सासरच्या मंडळीनं मुलीचा छळ करून तिला विष पाजून मारल्याचा माहेरच्या मंडळींचा संशय आहे. त्यामुळं रागाच्या भरात माहेरच्या नातेवाईकांनी अशा प्रकारे सासरच्या दारातच मुलीचा अंत्यसंस्कार केला.

सांगवी येथील गीतांजली नावाच्या विवाहितेच्या पोटात विषारी औषध गेल्याची घटना घडली होती.या प्रकारानंतर सुरुवातीला तिच्यावर बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर तिला पुण्यात उपचारासाठी नेण्यात आलं. ससून रुग्णालयात या विवाहितेवर उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान या विवाहितेचा मृत्यू झाला.

गीतांजलीच्या पती, सासू, नणंद, सासरे यांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करून जबरदस्तीनं तिला विषारी औषध पाजल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळं मुलीचा खून केल्याचा आरोप करत सासरच्या घरासमोरच गीतांजलीच्या पार्थिवावर कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केले. या प्रकारामुळं परिसरात एकच खळबळ उडाली होती.

बारामती तालुका पोलिसांनी या संपूर्ण घटनेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला होता. संपूर्ण वातावरण तणावाचं होतं. पोलिसांनी तसेच इतर मंडळींनी माहेरच्या लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी कोणाचंही काहीही ऐकलं नाही, आणि गीतांजलीच्या सासरच्या घरासमोर अंत्यसंस्कार केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago