ताज्याघडामोडी

बँकेची कामे वेळेत उरकून घ्या,जून महिन्यात तब्बल ९ दिवस बँका बंद राहणार, पाहा सुट्ट्यांची यादी

जर तुम्हाला बँकांची कामे उरकायची असतील तर एकादा जून महिन्याचे कॅलेंडर पाहूनच बाहेर पडा. कारण जून महिन्यात तब्बल नऊ दिवस बँका बंद असणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर जून महिन्यात नऊ दिवस बँकांचे कामकाज पूर्णपणे बंद असणार असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवारचा देखील समावेश आहे. आरबीआयद्वारे जाहिर केलेल्या सुट्ट्या सगळ्या सरकारी, खासगी, विदेशी आणि को-ऑपरेटिव्ह बँकांना देखील लागू आहेत. त्यामुळे तुम्हाला बँकेसंबंधीत काही महत्त्वाचे काम असल्यास ते जून महिन्याच्या सुट्ट्यापाहूनच उरकावे लागेल.

जून महिन्यात एकूण ९ दिवस बँकांच कामकाज बंद राहणार आहे. या ९ दिवसांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँकांकरता जाहिर केलेल्या सुट्ट्या आणि महिन्याच्या दुसरा, चौथा शनिवार आणि रविवारचा देखील समावेश आहे.

यात जूनमध्ये कोणताही मोठा सण- उत्सव नाहीत. त्यामुळे साप्ताहिक सुट्टीशिवाय केवळ ३ स्थानिक उत्सव आहेत. परंतु हे त्या-त्या राज्यांनुसार साजरे होत असल्याने बहुतांश राज्यांमध्ये बँका बंद राहतील.

भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने २०२० वर्षाचे सुट्ट्यांचे कॅलेंडर (Bank Holidays 2020 Calender)जाहीर केले आहे. यावर RBI चे म्हणणे आहे की, वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. यामुळे ग्राहकांना अपील केलं आहे की, बँकेशी संबंधित सगळी काम लवकरात लवकर उरकून घ्या. २०२१ या वर्षांचं बोलायचं झालं तर बँका ४० दिवस बंद राहणार आहे.

जून २०२१ मधील सुट्ट्यांची यादी

जून ६, २०२१ – रविवार

जून १२, २०२१ – दूसरा शनिवार

जून १३, २०२१- रविवार

जून १५, २०२१ – मिथुन संक्रांती व रज पर्व ( इजवाल-मिझोराम, भुवनेश्वरमध्ये बँका बंद राहतील.)

जून २०, २०२१ – रविवार

जून २५, २०२१ – गुरु हरगोविंदजी जयंती (जम्मू आणि काश्मीरमध्ये बँका बंद राहतील.)

जून २६, २०२१ – दुसरा शनिवार

जून २७, २०२१ – रविवार

जून ३०, २०२१ – रेमना नी (केवळ इजवालमध्ये बँक बंद राहिल. )

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

6 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

6 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago