घाटकोपरमध्ये रहाणाऱ्या पंचवीस वर्षीय तरुणाला त्याच्या अट्टल गुन्हेगार असलेल्या मित्राने एक टोळीच्या मदतीने हनी ट्रॅपमध्ये अडकवलं होतं. काही दिवसांपूर्वी त्याच्या फोनवर एक अज्ञात तरुणीचा फोन आला. त्या तरुणीने पीडित तरुणाशी ओळख वाढवली. त्यानंतर ते एकमेकांना लॉजवर भेटले. लॉजबाहेर येताच तरुणीच्या साथीदारांनी त्याला अपहृत केले आणि तब्बल 20 लाख रुपयांची खंडणी मागितली.पैसे दिले नाहीत तर तुझ्यावर बलात्काराची केस करणार, तुझा मित्रांना आणि कुटुंबाला यात अडकवणार, अश्या धमक्या ही टोळी देऊ लागली. सुदैवाने या तरुणाला त्याचा मित्र आणि वकील नितू सिंग यांनी मदत केली. धीर दिला आणि त्याने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
साहिल नाडर, रणजित मोरे, अरबाज खान या आरोपींना घाटकोपर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक म्हणजे साहिल नाडर हा पीडित तरुणाचा मित्रच आहे. त्यानेच हा सर्व ट्रॅप रचला होता. सध्या तिघा जणांना अटक केली असून यातील तरुणीसह आणखी आरोपींचा घाटकोपर पोलीस शोध घेत आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…