बुलडाणा, 26 मे : या ना त्या विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोर त्यांची 4 चाकी महागडी गाडी पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेमुळे बुलडाण्यात खळबळ उडाली आहे. हा पूर्वनियोजित कट होता, असा आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे.
संजय गायकवाड यांनी नेहमी प्रमाणे आपली गाडी इनोव्हा कार घरासमोर उभी केली होती. मध्यरात्री अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तींनी पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या आगीत गाडीच्या मागील भागाने नुकसान झाले आहे.घटना घडली तेव्हा संजय गायकवाड हे घरी नव्हते. कामानिमिताने संजय गायकवाड हे मुंबईला गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञातांनी गाडी जाळण्याचा प्रयत्न केला. संजय गायकवाड यांची गाडी जाळण्याचा प्रकाराने खळबळ माजली आहे
माझी गाडी जाळून मोठा स्फोट घडविण्याचा कट असल्याचा आरोप आमदार गायकवाड यांनी केला आहे. तसंच, राजकीय वादातून हा हल्ला करण्याचा प्रयत्न असावा असा संशय देखील त्यांनी व्यक्त केला आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतील. डॉग स्कॉडला देखील पाचारण करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून संजय गायकवाड हे आपल्या वेगवेगळ्या विधानांमुळे चर्चेत आहे. ‘मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी ते देंवेंद्र फडणवीसांच्या तोंडातच कोंबून टाकले असते,’ अशा प्रकारचं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं होतं. त्यानंतर बुलडाण्यात शिवसेना आणि भाजपमध्ये वाद चांगलाच पेटला होता.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…