प्रेमसंबंधात अडथळा ठरल्याने मयताच्या पत्नीच्या मदतीने प्रियकराने गळा आवळून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. अमरावती जिल्ह्यातील ही घटना असून अण्णा उत्तम जाधव (35, रा.बाजारसावंगी, ता. रत्नपूर) यांचा मृतदेह वैजापूर तालुक्यातील गारज शिवारात लोकविकास शुगर मिल्सच्या जागेवर सोमवारी आढळला होता.
अण्णाचा खून झाल्याचे समजल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली होती. स्थानिक गुन्हे शाखेने या खुनाचा तपास करण्यासाठी वेगवेगळी पथके तयार केली. तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेने 12 तासांच्या आत दोन आरोपींना गजाआड केले. आरोपीमध्ये मयताच्या पत्नीचा समावेश आहे.
काकासाहेब सर्जेराव कुटे (35) रा.दरेगाव, ता. रत्नपूर व नंदा आण्णा जाधव, रा. बाजारसावंगी अशी आरोपींची नावे आहेत. मयताची पत्नी नंदा व काकासाहेब यांची पत्नी दोघी मैत्रिणी आहेत. त्यामुळे काकासाहेब व नंदा यांचे प्रेम संबंध जुळले. या संबंधात अण्णा अडसर ठरत होता. तो नेहमी दारू पिऊन नंदाला शिवीगाळ करत होता. तसेच तिच्यावर संशय घेऊन त्रास देत होता. त्यामुळे नंदाने त्याचा काटा काढायचा ठरवले.
नंदाने प्रियकर काकासाहेब याला फोन करून अण्णाचा त्रास होत असून त्याचा काटा काढावा लागेल, असे सांगितले. त्यामुळे काकासाहेब याने अण्णा यास आपल्याला पैसे आणायला जायचे आहे. असे सांगून वैजापूर तालुक्यातील गारज शिवारात आणले. तेथे मोकळ्या जागेत दगडाने मारहाण करून त्यास जखमी केले. तसेच बेल्टने गळा आवळून त्याचा खून केला.
पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत कुंदे, पोलीस उपनिरीक्षक संदीप सोळंके व कर्मचारी यांच्या पथकाने ही घटना उघडकीस आणली. या प्रकरणी पुढील तपास शिऊर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरख शेळके हे करीत आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…