कोरोनाच्या या संकट काळात रुग्ण आणि रुग्णांची लूट सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे. या रुग्णालांना कधी चाप बसणार आणि सर्वसामान्यांची लूट कधी थांबणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. रुग्णालयाने डिपॉझिट म्हणून घेतलेले पैसे परत करण्याचे नावच घेत नसल्याने त्यांच्या विरोधात अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करण्यात आलं. अर्धनग्न आंदोलन करताच रुग्णालय प्रशासनाला खडबडून जाग आली आणि त्यांनी तात्काळ रुग्णाच्या नातेवाईकाला पैसे परत दिले.
नाशिकमधील एका खाजगी हॉस्पिटलने कोरोना बाधित रुग्णांना अवाजवी बिल आकारत त्याने भरलेले डिपॉझिटचे 1 लाख 40 हजार रुपये परत करण्यास नकार दिला होता.
या रुग्णांचे 10 लाख रुपये मेडिक्लेम कंपनीने हॉस्पिटलला दिले होते. मात्र या दरम्यान हॉस्पिटल सेफ साईड म्हणून 1 लाख 40 हजार रुपये डिपॉजीट म्हणून घेतले होते. तसेच ते पैसे परत सुद्धा देण्यात येत नव्हते.
या घटनेच्या विरोधात पीडित रुग्णांच्या मुलाने रूग्णांना आवाजवी बिल आकारणाऱ्या हॉस्पिटल विरोधात मोहीम सुरू केलेल्या ऑपरेशन हॉस्पिटल या सामाजिक चळवळीच्या टीमकडे मदत मागतली. यानंतर त्यांनी टीमसह हॉस्पिटलमध्ये धडक दिली आणि या टीमला देखील हॉस्पिटलने उडवा उडवीची उत्तरे देत पैसे देण्यास नकार दिला. या नंतर या टीमने थेट हॉस्पिटलच्या कार्यलयातच कपडे काढूत नग्न अवस्थेत आंदोलन करत पैसे मिळवून देण्याची मागणी केली. तब्बल 2 तास चाललेल्या या आंदोलनाला नंतर अखेर हॉस्पिटलने रुग्णाकडून घेतलेले डिपॉझिटचे 1 लाख 40 हजार रुपये परत केले.
कोरोनाच्या या संकटात अशा प्रकारे रुग्णालयांकडून सर्वसामान्य नागरिकांची लूट होण्याचे आतापर्यंत अनेक प्रकार समोर आले आहेत. या रुग्णालयांना चाप कधी बसणार आणि अशा प्रकारे नागरिकांची लूट कधी थांबणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…