समाजाचे शिल्पकार असणाऱ्या शिक्षकांनी दातृत्वाचा आदर्श निर्माण केला – आ. समाधान आवताडे ..
मंगळवेढा तालुक्यातील सर्व शिक्षक समन्वय समितीच्या वतीने आज कोरोना महामारीच्या परिस्थितीला तोंड देत असताना आपल्या अध्यापनीय कौशल्याने ज्ञानदानाचे पवित्र कार्य करून समाजातील अज्ञानाचा अंधकार दूर करून विद्येचा दिप तेवत ठेवणाऱ्या व समाज जडण – घडणीचे शिल्पकार असलेल्या तालुक्यातील शिक्षक बंधु – भगिनींनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या अनमोल सहकार्यातून कोरोनाला आटकाव करण्यासाठी दातृत्वाची केलेली ही कृती आदर्शचा नवा वास्तुपाठ आहे असे गौरवोउदगार पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे यांनी काढले आहेत.
मंगळवेढा तालुक्यात शिक्षकांच्या प्रश्नांसाठी विविध संघटना कार्यरत आहेत. या शिक्षक संघटनातील सर्व पदाधिकारी यांनी समन्वय समितीची स्थापना करून तालुक्यातील शिक्षकांना मदत करण्याचे आवाहन केले. त्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत तब्ब्ल ७ लाख रुपये निधी जमा झाला. त्या निधीतून आरोग्य विभागाला आवश्यक साधन सामुग्रीचे व आशा वर्कर यांना धान्य वाटपाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ आ. समाधान आवताडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
आज मंगळवेढा तालुक्यात सर्वसामान्य कोरोना बाधित रुग्णांची आवश्यक असलेल्या प्राणवायूची गरज भागावी म्हणून ७ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन, निरनिराळ्या गोळ्या व इतर आरोग्य साहित्य तसेच कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता आरोग्य विभागात अतिशय चांगल्या पद्धतीने आरोग्य सेवा देणाऱ्या आशा वर्कर यांना यावेळी धान्य वाटप केले. यावेळी आ. आवताडे म्हणाले की, तालुक्यातील जनतेच्या आरोग्य सेवा -सुविधा अधिक मजबूत व्हावी यासाठी प्रत्येकजण विविध मार्गांनी सहकार्य करत आहेत, त्यातच शिक्षकांनी सुद्धा आपल्या पेशाला साजेशे कार्य करून समाजातील दातृत्व भावनेला खूप मोठी बळकटी दिली असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
जेव्हा या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून नूतन आमदार म्हणून समाधान आवताडे यांनी पदभार स्वीकारला त्याचवेळी त्यांनी शिक्षकांच्या फ्रंट लाईन सेवेची दखल घेवून आपला पहिला पत्रव्यवहार शिक्षकांना ५० लाख विमा कवच देण्याबद्दल आ. समाधान आवताडे यांनी केल्याबद्दल आ. आवताडे यांचे यावेळी अभिनंदन केले.
या कार्यक्रमास प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार डॉ. स्वप्निल रावडे, माजी सभापती प्रदीप खांडेकर, गट शिक्षणअधिकारी लवटे साहेब, डॉ. नंदकुमार शिंदे, दामाजी शुगर संचालक सचिन शिवशरण, सुरेश पवार, संजय चेळेकर, संभाजी तानगावडे, भाऊसाहेब माने, संभाजी सलगर, सिद्धेश्वर सावत, अनिल दत्तु, धनंजय लेंडवे, विठ्ठल ताटे,सिद्धेश्वर सावत,न्यामगोंडे गुरुजी,राजेंद्र कांबळे,संतोष पवार,दत्तात्रय येडवे,अनिल दत्तू,चंदू पवार गुरुजी, अविनाश मोरे सर,आदी मान्यवर व शिक्षक उपस्थित होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…