कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने लोकांची परिस्थिती बिकट करून सोडली आहे. म्हणून रुग्णाची वाढती संख्या पाहता राज्य शासनाने महाराष्ट्रात १ जूनपर्यंत लॉकडाउन लावला. १ जूननंतर लॉकडाऊन उठणार का अशा चर्चा लोकांमध्ये सुरु आहेत. मात्र सध्या रुग्णाची संख्या घटत असल्याने राज्य सरकारकडून लॉकडाउन शिथिल करण्याची शक्यता आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी संकेत दिले आहे. मुख्यतः राज्य सरकार राज्यातील कडक निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याचे समजते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील आठवड्यात लॉकडाउनबाबत बोलताना लॉकडाउन उठवू शकतो, परंतु, लोकांना नियमांचं पालन करावं लागेल.
तसेच, यावेळी त्यांनी परिस्थिती पाहूनच निर्णय घेतला जाईल असे म्हटले होते. आता ठाकरे सरकार काय निर्णय घेणार हे १ जूनपर्यंतच स्पष्ट होणार आहे. तसेच राजेश टोपेंनी दिलेल्या महतीनुसार, आपण तयारीचा आढावा घेणार आहोत. जर सर्व गोष्टी सकारात्मक असतील तरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री टास्क फोर्समधील तज्ज्ञांशी चर्चा करत निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्याचा विचार करु शकतात. निर्बंध पूर्णपणे उठवले जातील या भ्रमात राहू नका, असे देखील टोपे यांनी म्हटले आहे.
या दरम्यान समजलेल्या माहितीनुसार, सरकारकडून लॉकडाउन उठवण्याची तयारी सुरु झाली असून ३० जूनपर्यंत सर्व गोष्टी पार पडतील. निर्बंध शिथील करण्यास नेमकी कधीपासून सुरुवात होईल याबाबत अजून स्पष्टता नाही. परिस्थिती नुसार काही प्रमाणात शिथिल करण्यात येणार आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार लॉकडाउन हा ४ टप्यात उठवला जाणार असल्याची शक्यता आहे. ते जाणून घ्या
१. दुकानांना सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली जाईल.
२. दैनंदिन गरजांशी संबंधित अन्य काही दुकानांना सुरु ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकते. पर्यायी दिवसांवर ही दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाईल,.
३. हॉटेल्स, परमिट रुम, बिअर बार, दारुच्या दुकानांना निर्बंधासह सुरु ठेवण्यास परवानगी असेल. हॉटेल्सना ५० % क्षमतेसह सुरु ठेवण्याची परवानगी दिली जाईल.
४. मुंबई लोकल, धार्मिक स्थळं, जिल्हाबंदी पुढे ढकलली जाऊ शकते.
या गोष्टीवर लॉकडाउनबाबत निर्णय घेतला जाईल –
१) कोविड पॉझिटिव्हिटी रेट एका अंकावर घसरत आहे.
२) आयसीयू ऑक्सिजनची उपलब्धता ६० टक्क्यांहून अधिक असणे.
३) राज्यभरातील एकूण मृत्यूदर
तसेच, ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. अनलॉक करण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक गोष्टींची चाचपणी केली जाणार आहे. परंतु, जर रुग्णसंख्या वाढू लागली आणि हव्या तितक्या प्रमाणात लसीकरण झालं नसेल तर पुन्हा लॉकडाउन लागण्याची शक्यता आहे. असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…