भीती वाटते…काळजी करू नका
फोनद्वारे होणार समुपदेशन
जिल्हा प्रशासन आणि संगमेश्वर महाविद्यालयाचा उपक्रम
सोलापूर, दि.24: तुम्हाला भीती वाटतेय का… तुमच्या मनावर ताण येतोय का… चिंता करताय का…. घाबरू नका तुमची भीती, काळजी, चिंता जिल्हा प्रशासन आणि संगमेश्वर महाविद्यालय दूर करणार आहे. जिल्हा प्रशासन आणि संगमेश्वर महाविद्यालयाने कोरोना काळातील जनतेच्या मनातील भीती घालविण्यासाठी समुपदेशकांची नेमणूक केली असून ते फोनद्वारे टेली कॉन्सिलिंग समुपदेशन करणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी दिली.
सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत समुपदेशक आपल्या मनातील भीती दूर करतील, फक्त आपण त्यांना फोन करून आपल्या समस्या मांडायच्या आहेत. समुपदेशकाकडे व्यक्त केलेली माहिती गोपनीय ठेवली जाणार आहे.
प्रा. डॉ. एस.जी. सोनटक्के (9860066884), प्रा. डॉ. सोपान मोहिते (9860640552), प्रा. अर्पिता सागर (8080879934), डॉ. संदीप गोडसे (9890475512), अविनाश बोकेफोडे (9423202203), गणेश पाटील (9370836556), जयश्री धाप्पाधुळे(9970117085), सूरज अनुसे (9960369900), पूजा उदसे (9175418097), कामिनी कांबळे (9096721167), आकांक्षा बोकेफोडे (7743953362), ओंकार गरड (8605772708), धीरज मोरे (9172357571), पूजा इंगळे (8805050304), मीनल बुरुंजे (9403761456) आणि श्रद्धा पवार (9011883894) यांच्यापैकी कोणाशीही आपण संपर्क करून आपल्या शंका, ताणतणाव दूर करू शकता. दिलेल्या वेळेतच फोन करण्याचे आवाहन श्री. वाघमारे यांनी केले आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…