गुरसाळे नजीक भीमा नदीतून बोलेरो,टाटा सुमो,ओमनी व्हॅन द्वारे अवैध वाळू उपसा

पंढरपुर तालुक्यातील गुरसाळे येथील भीमा नदीच्या पात्रातून सुमो व व्हॅन च्या माध्यमातून अवैध वाळू उपसा केला जात असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांना मिळाली असता त्यांनी या बाबत दिलेल्या कारवाईच्या आदेशानुसार गुरसाळे बीटला नेमणूकीस असणारे बीट अंमलदार पो.कॉ.गोरख भराटे, पो. हे.कॉ. नलवडे,पो.ना.भोसले दि.23/05/2021 रोजी पहाटे 03:15 वा.सुमारास गुरसाळे,ता.पंढरपूर येथील भिमानदी पात्रामधील महादेव मंदीराजवळ चालू असले नवीन पुलाचे बांधकामावरील कामगारांचे पत्राशेडचे पाठीमागील बाजूस गेले असता तेथे काही इसम एक पांढरे रंगाची बोलेरो, पांढरे रंगाची टाटा सुमो व एक ओमणी व्हन असे तीन वाहनांमध्ये वाळू भरत असल्याचे पोलीस कर्मचाऱ्यांना मोटार सायकलींचे उजेडामध्ये दिसले.पोलीस आल्याचे पाहून वरील वाहनांवरील चालकांनी आपले ताब्यातील वाहने चालू करुन भरलेल्या वाळूसह भरधाव वेगाने गुरसाळे गावाकडे घेवून गेले.एक इसम मोटार सायकलवरुन त्यांचे पाठीमागे भरधाव जावू लागला. सदर वाहनांचा पाठलाग केला असता मोटार सायकल सायकलवरील इसम मिळून आला परंतू इतर तीन वाहने मिळून आली नाहीत.मोटार सायकलवरील इसमास त्याचे नाव गाव विचारता त्याने आपले नाव संतोष दगडू चव्हाण,वय – 43 वर्षे,रा.चव्हाण वस्ती,गुरसाळे,ता.पंढरपूर असे असल्याचे सांगितले.त्याने पांढरे रंगाची बोलेरो जीप नं. MH13-7421 ही आपले मालकीची असून ती आपण स्वत: तसेच आबा बलभीम चव्हाण,रा.खरात वस्ती,गुरसाळे,ता.पंढरपूर, वैभव पांडूरंग कोळेकर,रा.कोळेकर वस्ती,गुरसाळे,ता.पंढरपूर व राजू नवनाथ चव्हाण,रा.चव्हाण वस्ती,गुरसाळे,ता.पंढरपूर असे चौघांचे भागीदारीमध्ये आहे. तसेच पांढरी सुमो ही पंकज पांडूरंग कोळेकर,रा.कोळेकर वस्ती,गुरसाळे,ता.पंढरपूर, संदीप ऊर्फ सनी अशोक वाकसे,रा.पुर्नवसन टाकळी,ता.पंढरपूर व भाऊसो रावसाहेब वाकसे,रा.सदर यांचे मध्ये भागीदारात आहे. त्याचप्रमाणे ओमिनी व्हन ही अजिंक्य अमर कोळेकर,रा.कोळेकरवस्ती,गुरसाळे,ता.पंढरपूर याची असल्याचे सांगितले. त्यास बोलेरो जीप मध्ये भरलेली वाळू ही कोणास देण्याकरीता घेवून चालला होता असे विचारले असता त्याने आपले स्वत:चे बांधकाम चालू असून ती आपले घरी नेण्यासाठी घेवून जाण्यासाठी आलो होतो व बोलरोवर आबा चव्हाण हा चालक म्हणून असल्याचे सांगितले. त्यास सुमो जीपवर व ओमिनी व्हन या वाहनांवर चालक म्हणून कोण होते असे विचारले असता त्याने सुमो जीपवर भाऊसो वाकसे व ओमिनीवर अजिंक्य कोळेकर हा स्वत: चालक असल्याचे सांगितले.

या प्रकरणी 1) संतोष दगडू चव्हाण,वय – 43 वर्षे,रा.चव्हाण वस्ती,गुरसाळे,ता.पंढरपूर, 2) आबा बलभीम चव्हाण,रा.खरात वस्ती,गुरसाळे,ता.पंढरपूर, 3) वैभव पांडूरंग कोळेकर,रा.कोळेकर वस्ती,गुरसाळे,ता.पंढरपूर. 4) राजू नवनाथ चव्हाण,रा.चव्हाण वस्ती,गुरसाळे,ता.पंढरपूर, 5) पंकज पांडूरंग कोळेकर,रा.कोळेकर वस्ती,गुरसाळे,ता.पंढरपूर, 6) संदीप ऊर्फ सनी अशोक वाकसे,रा.पुर्नवसन टाकळी, ता.पंढरपूर, 7) भाऊसो रावसाहेब वाकसे,रा.सदर, 8) अजिंक्य अमर कोळेकर,रा.कोळेकरवस्ती, गुरसाळे, ता.पंढरपूर यांच्या विरोधात भा.दं.वि.कलम 379,34 सह गौण खनिज कायदा 1978 चे कलम 4(1),4(क)(1) व 21 प्रमाणे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

4 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

4 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago