कोरोना महामारीच्या संकटात काही खासगी रुग्णालयं रुग्णांच्या नातेवाईकांना लुबाडत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या सगळ्या घटना ताज्या असतानाच बुलडाण्याच्या खामगावात संतापजनक घटना समोर आली आहे.
बिलमध्ये 11 हजार रुपये कमी पडत होते म्हणून रुग्णालय प्रशासनाने थेट रुग्णाच्या पत्नीचं मंगळसूत्र घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जोपर्यंत 11 हजार रुपये किंवा मंगळसूत्र देत नाही तोपर्यंत रुग्णाला डिस्चार्ज देणार नाही, अशी तंबी देखील या रुग्णालयाने रुग्णाच्या नातेवाईकांना दिली होती. अखेर रुग्णाच्या पत्नीला गळ्यातील मंगळसूत्र काढून रुग्णालय प्रशासनाला द्यावं लागलं.
संबंधित घटनेवर रुग्णाच्या मोठ्या भावाने नाराजी व्यक्त केली आहे.मुलाच्या उपचारासाठी त्याच्या पत्नीने कानातील दागिने गहान ठेवले होते. खरंतर त्या दागिन्यांची किंमत 28 हजार रुपये इतकी होती.
मात्र, वेळ वाईट असल्याने समोरच्याने फक्त 23 हजार दिले. रुग्णालयात मुलाला आता डिस्चार्ज मिळणार होता. रुग्णालय प्रशासनाने हिशोब केला. त्या हिशोबत आमच्याकडे 11 हजार रुपये कमी पडत होते. तर रुग्णालय प्रशासनाने ते पैशे दिल्याशिवाय रुग्णाला सोडणार नाही, अशी भूमिका घेतली.
त्यानंतर त्यांनी रुग्णाच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्रच मागितलं. आमचा रुग्ण तिथे असल्याने आम्हाला नाईलाने मंगळसूत्र जमा करावं लागलं, अशा शब्दात रुग्णाच्या भावाने व्यथा मांडली
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…