पुलाच्या कठड्यावर चढून आत्महत्येच्या तयारीत असलेल्या एका महिलेचे प्राण वाहतूक शाखेच्या एका दक्ष कर्मचाऱ्यामुळे वाचले असून आत्महत्येचा प्रयत्न करणारी हि महिला एका आमदाराची पत्नी असल्याची माहिती पुढे आली आहे.
टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास मानखुर्द पोलीस वाहतुकीचं (Mankhurd traffic police) नियोजन करत होते. त्याचवेळी एका दुचाकी चालकानं एका महिला ब्रीजच्या कठड्यावर चढली असून ती रडत असल्याची माहिती पोलिसांना दिली.घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल ढगे यांना तातडीनं घटनास्थळी पाठवण्यात आलं. यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी कंट्रोल रुम, मानखुर्द पोलीस स्टेशन तसंच नवी मुंबई पोलिसांना घटनेची माहिती दिली.
घटनास्थळी पोहोचल्यावर ढगे यांनी संवदेनशीलता लक्षात घेऊन महिलेशी चर्चा करुन युक्तीनं खाली उतरवत आत्महतेपासून परावृत्त केलं. त्यानंतर त्या महिलेला मानखुर्द पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. तिथे पोलिसांनी चौकशी केली असता आपण आमदाराची पत्नी असल्याचं त्या महिलेनं सांगितलं. कौटुंबिक वादामुळे आपण हे पाऊल उचलल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. त्यानंतर आमदाराच्या पत्नीला नवी मुंबई पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…