गुन्हे विश्व

सुनेनं केला सासूचा खून, पत्नीला वाचविण्यासाठी लेकानं केलं असं काही

राग अनावर झाल्याने सुनेने सासुचा ब्लाऊजच्या सहाय्याने गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हा प्रकार तळेगाव शहरातील टेल्को हाऊसिंग सोसायटीत घडली आहे. सासू-सुनेच्या भांडणातून सुनेने हे टोकाचे पाऊल उचलले असून यामध्ये पतीचाही सहभाग आहे. बेबी शिंदे असे खून झालेल्या सासूचे नाव असून पूजा शिंदे (सून), मिलिंद शिंदे (पती) असे आरोपीची नावे आहेत.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारी सकाळी पूजा आणि सासू बेबी शिंदे या दोघींमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर पूजाला राग अनावर झाल्याने घरातील कापडी ब्लाउजच्या साह्याने तिने आपल्या सासूचा गळा आवळून खून केला.

हा सर्वप्रकार आपला पती मिलिंद यास सांगितला दोघांनी संगणमत करून मृतदेह एका प्लास्टिकच्या पोत्यात भरला आणि मृतदेह घराच्या छतावर एका कोपऱ्यात ठेवला. मात्र मृतदेह कुजू लागल्याने त्याची दुर्गंधी इतरत्र पसरू लागल्याने आपण केलेला गुन्हा उघडकीस येईल या भीतीपाई पती व पत्नीने मिळून मृतदेह उचलून जवळच असलेल्या एका निर्जन ठिकाणी झाडा झुडपात फेकून दिला. परंतु पोत्या मधून येणाऱ्या दुर्गंधीने टेल्को कॉलनी येथील रहिवाशांचा संशय बळावला, त्यांनी ही घटना पोलिसांना कळविली.

मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर तळेगाव पोलिसांनी चौकशीसाठी मयत महिलेची सून पूजा शिंदे हिला ताब्यात घेतले. सुरुवातील तिने उडवाउडवीची उत्तर दिली, पण सासूच्या भांडणाला आणि त्रासाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याची कबुली पोलिसांना दिली. या संपूर्ण प्रकरणात पती मिलिंद याचा ही सहभाग असल्याचे पूजाने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून या प्रकरणी अमित शिंदे याने तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 day ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago