ताज्याघडामोडी

23 दिवसात 127 रुग्ण बरे होऊन घरी परतले  करकंब कोवीड सेंटर कोरोना रुग्णांसाठी ठरतय वरदान…. समाज सेवकांनी अनेक रुग्णांना दिले जीवदान

करकंब प्रतिनिधी . जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून सेंटर सुरू करण्याबाबत झालेल्या संकल्पनेला पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील कोविड केअर सेंटर ला करकब येथील समाज सेवक सचिन शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेऊन याबाबत समाजामध्ये जनजागृती करून या कोविड केअर सेंटर मध्ये दाखल झालेल्या रुग्णांना स्थानिक लोकांच्या सहकार्यातून तसेच समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून बदाम काजू खजूर मसाला दूध बिर्याणी उकडलेली अंडी मास्क व सकस आहार दिला जात आहे याबाबत समाजसेवक सचिन शिंदे हे प्राधान्याने लोकसहभागातून हे काम करीत आहेत त्यांना सहारा बहुउद्देशीय संस्था सचिन हराळे कन्हैया काळे प्रदीप कंकाळ यल्लाप्पा जाधव अविनाश जाधव तवाक्कल चिकन सेंटर लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था करकंब सुवर्णक्रांती मल्टी टेस्ट पतसंस्था करकंब तसेच गावातील इतरही लोक याबाबत सहकार्य करीत आहे करकम चे पन्नास बेडचे कोवड केअर सेंटर हे सर्वांसाठी उपयुक्त ठरत आहे ग्रामपंचायत प्रशासनातील कर्मचारी स्वच्छता फवारणी सुरक्षा रक्षकाचे काम करत आहेत तर प्रशासनामार्फत पाणी जेवण नाश्ता चहा दैनंदिन साहित्य चादर बेडशीट हे सर्व मोफत दिले जात आहे प्राथमिक स्तरावर गोळ्या औषध मोफत दिली जातात तर सौम्य त्रास जाणवणारे रुग्ण वेगळी औषधे खाजगी मेडिकल मधून विकत घेऊन बरे होत आहेत ग्रामीण रुग्णालय व गावातील डॉक्टर मार्फत उपचार मिळत असल्याने रुग्णांचे मनोबल मनोधैर्य चांगले वाढत आहे त्यामुळे सहजासहजी कोरोना वर विजय मिळवला जात आहे या कोरणा सेंटरमुळे पंढरपूर सोलापूर अकलूज यासारख्या शहरी भागातील आरोग्य यंत्रणा चा ताण कमी झाला असून करकम चे हे पन्नास बेडचे कोविड केअर सेंटर रुग्णांसाठी या समाज सेवक ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर प्राथमिक आरोग्य केंद्र प्रभा साखरेसरपंच तेजमाला पांढरे गावातील डॉक्टर जिल्हा परिषद प्रशासन ग्रामपंचायत प्रशासन उपसरपंच आदिनाथ देशमुख व कोरोना जनजागृती समिती चे सर्व सदस्य आशा वर्कर दत्तात्रेय खंदारे गावातील शिक्षक यांच्यामुळे एक जीवनदायी कवच निर्माण केले आहे .

करकंब ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्रशासनाच्या सहकार्याने सुरू झालेल्या या सेंटर मधून आज पर्यंत 127 पेशंट यशस्वी उपचार घेऊन घरी परतले यामध्ये तीन वर्षाच्या बालकापासून पन्नास वर्षाच्या रुग्णापर्यंत अनेकांनी उपचार घेऊन आपल्या घरी गेलेत दोन ते तीन रुग्णांचा अपवाद वगळता कोणालाही उपचारासाठी बाहेर पाठवत आले नाही व इतर सर्व रुग्णांना या ठिकाणी उपचार देण्यात आले.

समाज सेवक सचिन शिंदे

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

1 day ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

1 day ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago