ताज्याघडामोडी

श्री सिद्धसिंहासन पीठाधीश श्रीगुरु गुंडा महाराज सिद्धर्स उदगीरकर यांची वैद्यकीय साहित्याची मदत

आज दि 23।05।2021 मोहिनी एकादशी रविवार रोजी श्री सिद्धसिंहासन पीठाधीश श्रीगुरु गुंडा महाराज सिद्धर्स उदगीरकर यांनी पंढरपुर उपजिल्हा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ श्री अरविंद गिराम यांना संपर्क करुन रुग्णालयातील तात्काळ निकडीच्या व अत्यावश्यक वैद्यकीय वस्तुंची यादी मागवुन घेतली होती.

डॉ श्री अरविंद गिराम यांच्या मागणी प्रमाणे श्री गुरु गुंडा महाराज उदगीरकर यांनी रुग्णा साठी तात्काळ उपयोगी ठरणाऱ्या वस्तु म्हणजे strature with o2 trolly (1) , wheel chair with o2 trolly (1), IV stand (10), Glucometre with strips (2), Multipara moniter figure probe , oxygen flowmetre (10), jumbo oxygen cylinder trolly, अश्या अंदाजे एक लाख ते सव्वा लाख रुपयांच्या वस्तुंची मदत देवु केली आहे.

सदरच्या वस्तुंची मदत ही ह.भ.प. श्री चक्रीनाथ गुंडा महाराज सिद्धरस (उदगीरकर) यांचे हस्ते पंढरपुर उपजिल्हा रुग्णालयात समक्ष जाऊन देण्यात आली. सदर कार्यक्रम प्रसंगी पंढरपुर उपजिल्हा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.श्री अरविंद गिराम, डॉ. श्री प्रसन्न भातलवंडे, डॉ श्री दीपक धोत्रे, डॉ श्री संभाजी भोसले, डॉ श्री मिलिंद जोशी , कोविड सिस्टर नाडगौड़ा, सनगर समाज अध्यक्ष श्री संतोष ढोबळे, adv अरुण सुहास माळवे, श्री प्रमोद ढोबळे, श्री अनूप देवधर, श्री शिवराज माळवे, श्री सूरज कारंडे, श्री नीलेश कौलवार, श्री दिलीप पालसांडे, पंढरपुर उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी ऑफिस स्टाफ, असे सर्वजण उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये ह भ प श्री चक्रीनाथ महाराज , वैद्यकीय अधिकारी डॉ अरविंद गिराम, डॉ प्रसन्न भातलवंडे, डॉ मिलिंद जोशी, यांनी आपले मनोगत मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ भातलवंडे यानी केले आणि उपस्थितांचे आभार adv माळवे यांनी मानले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

1 day ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

1 day ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago