ताज्याघडामोडी

अलर्ट ! ‘या’ नंबरहून SMS आल्यास दुर्लक्ष करा, बँकेतील अकाऊंट होईल रिकामं, जाणून घ्या

सतत होणाऱ्या अनेक माध्यमातून लोकांची फसवणूक होत आहे. याला चाप लावण्यासाठी सायबर क्राईम (Cyber Crime) विभागाने काही क्रमांक शेअर करत सर्वांना दक्षतेचा इशारा दिलाय. या क्रमांकावरून आलेल्या SMS मधून फसवणूक करायचा अधिक धोका आहे. अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईमने दिला आहे.
अधिक माहितीनुसार, तुम्हाला देखील हा फसवणुकीता मेसेज आला असेल. त्यामध्ये तुमचे सिम काही KYC मधील समस्येमुळे ब्लॉक केले असून संबंधित क्रमांकावर फोन करा अशी सूचना दिली असेल. मात्र, या क्रमांकावर कधीही फोन करु नका. या मेसेजमध्ये सांगितलेले कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड देखील करु नका.
तसेच, कोणतेही पेमेंट करु नका. अशी माहिती दिल्लीच्या डीसीपी सायबर क्राइमने ट्विट करत दिले आहे.

या दरम्यान, KYC मध्ये आलेल्या काही अडचणींमुळे तुमचा क्रमांक ब्लॉक होऊ शकतो अशी सूचना देणारा मेसेज या नंबरहून येतो. ही अडचण दूर करण्यासाठी काही नंबरवर फोन करण्याची सूचना या मेसेजमध्ये दिलेली आहे. जी मंडळी या मेसेजला फसतात, त्यांची फसवणूक होत आहे. दरम्यान, सायबर क्रिमिनल ग्राहकांना VIP नंबरसाठी पेमेंट करणे अथवा अकाऊंटची माहिती देण्यासाठी थर्ड पार्टी अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे मोह करत आहेत. तसेच खोट्या ओटीपीद्वारे ग्राहकांची फसवणूक होत असल्याने सर्वांनी अलर्ट राहणे महत्वाचे. असे ग्राहकांना याबाबत माहिती Airtel कंपनीचे सीईओ गोपाळ वित्तल यांनी दिलीय.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 day ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago