नेल्लोर (आंध्र प्रदेश) : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरु आहे. कोविड-19 वरील औषधासाठी संशोधन सुरु आहे. तर दुसरीकडे आंध्र प्रदेशच्या एसपीएस नेल्लोर जिल्ह्यातील कृष्णपटणम या छोट्याशा गावात कोविड-19 वरील आयुर्वेदिक औषधासाठी भलीमोठी रांग पाहायला मिळत आहे. झटक्यात कोरोना बरा करणाऱ्या या औषधासाठी आजूबाजूच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने इथे येतात. बी आनंदय्या नावाच्या वैद्याने आपलं हे औषध कोरोनावर प्रभावी असल्याचा दावा केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल झाला, परिणामी इथे दूरुन लोक येऊ लागले. इतकंच नाही तर शेजारच्या राज्यांमधूनही अनेक नागरिक हे औषध घेण्यासाठी येत आहेत.
आनंदय्या यांनी तयार केलेल्या औषधाची तुलना हैदराबादमधील बथिनी बंधूंनी दमा बरा करण्यासाठी तयार केलेल्या ‘फिश प्रसादम’ औषधासोबत केली जात आहे.
दरम्यान हे आयुर्वेदिक औषध कोविड-19 वर प्रभावी आहे का, यामुळे आजारी व्यक्ती बरा होतो का हे अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु तरीही मोठ्या संख्येने नागरिक या गावात औषधासाठी गर्दी करत आहेत. परंतु हे औषध घेण्यासाठी सोशल डिस्टन्सचा मात्र पुरता बोजवारा उडाला.
लोकांना औषधाचं मोफत वाटप
कृष्णपट्टणम कोरोना औषध असं या आयुर्वेदिक औषधाचं नाव आहे. आनंदय्या आपलं आयुर्वेदिक औषध लोकांना मोफत देत आहेत. शिवाय ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना आयड्राप देखील दिला जातो. या औषधाचे दोन थेंब डोळ्यात टाकल्यानंतर अवघ्या काही मिनिटात ऑक्सिजन पातळी वाढते, असा दावा केला जात आहे. तर गुळवेल, कडूनिंब, काळीमिरी, आलं आणि हळद यांच्या मिश्रणातून तयार केलेल्या आयुर्वेदिक गोळ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना दिल्या जातात. तसंच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही या गोळ्या दिल्या जात आहेत.
उच्चस्तरीय आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून औषधाबाबत माहिती
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांनी कोविड-19 संबंधित एका उच्चस्तरीय आढावा बैठकीत कृष्णपट्टणममधील औषधाबाबत माहिती घेतली. तर हे औषध प्रभावी आहे का हे जाणून घेण्यासाठी आम्ही आयसीएमआर आणि तर तज्ज्ञांमार्फत या औषधावर संशोधन करण्याचा निर्णय घेतला आहे, असं उपमुख्यमंत्री ए के के श्रीनिवास यांनी आढावा बैठकीनंतर सांगितलं.
हे औषध कोविड-19 वर प्रभावी आहे की नाही, तसंच हे औषध बनवण्याची कृतीच्या संशोधनासाठी आंध्र प्रदेश सरकारने तज्ज्ञांचं पथक तसंच आयसीएमआरची एक टीम नेल्लोरला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचाही औषधाचा अभ्यास करण्याचा सल्ला
उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनीही केंद्रीय आयुष मंत्री आणि आयसीएमआरला या औषधावर संशोषन करायला सांगितल्याचं कळतं. व्यंकय्या नायडू देखील एसपीएस नेल्लोर जिल्ह्यातील आहेत.
औषधाचे दुष्परिणाम नाही; आमदार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
ज्यांनी हे औषध खाल्लं किंवा वापरलं त्यांच्यात कोणतेही दुष्परिणाम दिसले नाहीत, असं आमदार के गोवर्धन रेड्डी यांनी सांगितलं. तर दुसरीकडे जिल्हा पंचायत अधिकारी धनलक्ष्मी याच्या नेतृत्त्वाखाली नेल्लोरचे जिल्हाधिकारी के व्ही एन चक्रधर बाबू यांनी एका समितीची नेमणूक केली असून त्यात आयुष डॉक्टर आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे. शिवाय ज्या रुग्णांनी या औषधाचं सेवन केलं, त्यांच्यात दुष्परिणाम दिसले नाहीत, असंही म्हटलं. दरम्यान या औषधाचे नमुने तपासणीसाठी हैदराबादमधील आयुष प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…