राज्यात कोविडच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे फुटपाथवरील अधिकृत फेरीवाल्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. या फेरीवाल्यांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी राज्य सरकारने 61 कोटी 55 लाख रुपयांचा निधी वितरित केला आहे.
कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात निर्बंध लावले आहेत. त्यामध्ये फेरीवाले व फुटपाथवरील विव्रेत्यांचाही समावेश आहे. या काळात त्यांचा उदरनिर्वाह चालण्यासाठी राज्यातील अधिकृत फेरीवाल्यांना दीड हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील दुर्बल घटकांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून फेरीवाल्यांना ही मदत देण्यात येत आहे.
राज्यातील बांधकाम मजुरांनाही सरकारने आर्थिक मदत दिली आहे. राज्य सरकारकडे नोंद असलेल्या नऊ लाखांहून अधिक बांधकाम मजुरांना राज्य सरकारने 137 कोटी 31 लाखांहून अधिक निधी दिला आहे. महाविकास आघाडी सरकारने घरेलू कामगारांसाठीही मदतीचा हात पुढे केला आहे. घरकाम करणाऱया कामगारांसाठी 15 कोटी 82 लाख 50 हजार रुपये वितरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे सध्याच्या आर्थिक संकटाच्या काळात घरकाम करणाऱया कामगारांना तसेच आर्थिक दुर्बल घटकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…