ताज्याघडामोडी

लसीकरण मोहिमेचा फज्जा उडण्यास केंद्र सरकारच जबाबदार, सीरमचे स्पष्टीकरण

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करणाऱ्या आणि तिसऱ्या लाटेला कसं थोपवायचं हा विचार करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना लस मिळवण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. लसींचा पुरेसा साठाच नसल्याने तुटपुंज्या प्रमाणात त्या लोकांना देण्यात येत आहेत. 60 वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस प्राथमिकतेने मिळावा यासाठी 18 ते 44 या वयोगटातील लसीकरण काही ठिकाणी तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. या सगळ्या परिस्थितीला केंद्र सरकारच जबाबदार असल्याचे स्पष्टीकरण सीरम इन्स्टीट्यूटने दिले आहे.

सीरम इन्स्टीट्यूट ही हिंदुस्थानात दिल्या जात असलेल्या कोव्हीशिल्ड लसीचे उत्पादन करते. सीरमने त्यांच्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की लसींचा साठा उपलब्ध आहे अथवा नाही हे न पाहताच केंद्र सरकारने लसीकरणाला सुरुवात केली.

लसीकरणासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने तयार केलेली नियमावली काय आहे हे न पाहाता केंद्र सरकारने विविध वयोगटातील लोकांच्या लसीकरणास परवानगी दिल्याचंही सीरमने म्हटलं आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या ट्विटर हँडलवर सीरमचे स्पष्टीकरण प्रसिद्ध करण्यात आले आहे. सीरमचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. लसीकरणासंदर्भात एक ई-संम्मेलन आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये सर्व देशांनी लसीकरणासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमावलीचे पालन करावे अशा सूचना देण्यात आल्या होत्या. या नियमावलीत जी प्राथमिकता ठरवून दिली आहे त्यानुसारच लसीकरण व्हावं असंही सांगण्यात आलं होतं. लसीकरणाला सुरूवात होण्यापूर्वी 30 कोटी लोकांना लस टोचण्याचं उद्दीष्ट्य ठरवण्यात आलं होतं. यासाठी 60 कोटी डोसची गरज होती. हे उद्दीष्ट्य गाठण्यापूर्वीच सरकारने 45 तसेच 18 वर्षांवरील लोकांच्या लसीकरणाला परवानगी देऊन टाकली होती.

अॅस्ट्राझेनेकाने कोरोनावर तयार केलेल्या कोव्हीशिल्ड लसीचे उत्पादन सीरम इन्स्टीट्यूट करत आहे. लसींची वाढती मागणी पूर्ण करण्यात सीरम अपयशी ठरत असल्याचा आरोप केला जात असून त्यांच्यावर टीका केली जात आहे. यामुळेच या कंपनीने स्पष्टीकरण जाहीर केले आहे. सीरमने लसींची वाढती मागणी लक्षात घेता, विदेशातही लस उत्पादनाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही आठवड्यात या संदर्भातील घोषणा केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी अदर पूनावाला यांनी जाहीर केले होते की जुलै महिन्यापासून कोव्हीशिल्डचे 10 कोटी डोस तयार केले जातील.

देश सोडून पळालेलो नाही! पूनावाला यांचे स्पष्टीकरण

मी आणि माझा मुलगा अदर देश सोडून पळून गेल्याच्या वावडय़ा उठवल्या जात आहेत. आमच्यासारख्या देशप्रेमी कुटुंबासाठी या अफवा मनाला आणि हृदयाला क्लेश देणाऱयाच आहेत. प्रत्येक उन्हाळ्यात आमचे कुटुंब काही दिवसांसाठी सुट्टीवर लंडनला येते. त्यामुळे आम्ही आमचा देश सोडून कुठेही पळालेलो नाही, असे स्पष्टीकरण पूनावाला उद्योगसमूहाचे मालक सायरस पूनावाला यांनी इंग्लंडमध्ये एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष अदर पुनावाला लंडनमध्ये आहेत. त्यानंतर आता त्यांचे वडील सायरस पुनावाला हे देखील लंडनमध्ये गेल्याने अफवांना ऊत आला आहे. देश सोडून गेल्याच्या वावडय़ा उठू लागल्या आहेत. त्यावर सायरस पुनावाला यांनी स्पष्टीकरण देत अफवांचे खंडन केले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

14 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago