सांगली | जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिक अरुण योगिनाथ कुशिरे हा २५ हजार रुपयांची लाच घेताना सापडला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी दोन वाजता जिल्हा परिषदेतच त्याला पैसे घेताना रंगेहात पकडले. ऐन कोरोनाच्या धामधुमीत कारवाई झाल्याने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली.
जिल्हा परिषदेच्या एका ठेकेदाराने केलेल्या कामांची बिले मिळण्यासाठी बांधकाम विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. कामासाठी ठेवलेल्या अनामतीची मुदत संपल्याने ती देखील मिळावी अशी विनंती केली होती.
या कामाची फाईल मंजूर करण्यासाठी कुशिरेने ठेकेदाराकडे ३५ हजार रुपये मागितले होते, त्यापैकी २५ हजार रुपये गुरुवारी घेऊन येण्यास सांगितले होते. तक्रारदारांकडून लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. कारवाईची माहिती काही वेळातच जिल्हा परिषदेत पसरली.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…