ताज्याघडामोडी

बनावट नोंद प्रकरणी तलाठी,मंडल अधिकारी यांना खातेनिहाय चौकशीची नोटीस

पतीच्या निधनानंतर वारस म्हणून कायदेशीर पत्नी आणि मुलांची नावे न लावता बनावट प्रतिज्ञापत्र आणि खोटी कागदपत्रे वापरून संगनमताने अनधिकृत महिलेचे नांव सात बारा उतारावर लावल्याप्रकरणी तलाठी आणि मंडल अधिकारी यांना निलंबित करून खातेनिहाय चौकशी का करू नये,याबाबतची नोटीस बजावण्यात आली आहे.त्यामुळे महसूल खात्यात खळबळ उडाली आहे.
अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे येथील शेतकरी बसवराज तोरणगी यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा रोहित तोरणगी यांनी विहीत नमुन्यातील अर्ज देऊन वडिलांच्या पश्चात शेतजमीनीचे वारसदार म्हणून नाव लावण्याची विनंती तलाठीकडे केली होती.
दरम्यान पार्वती सिद्राम कुरे या अनधिकृत महिलेने तहसीलदारांचा बोगस शिक्का मारलेले बनावट प्रतिज्ञापत्र आणि अवैध पुरावे देऊन मयताची पत्नी असल्याचा बनाव करून तलाठी यांच्याकडे आपल्या नावाच्या नोंदीसाठी अर्ज दिला होता.ती बेकायदेशीर कागदपत्रे ग्राह्य धरून तलाठी राहूल वाघमारे यांनी अनधिकृत महिलेची नोंद घेतली.त्याला राहूल तोरणगी यांनी लेखी हरकत नोंदवली होती.मात्र करजगीचे मंडल अधिकारी मनोज गायकवाड यांनी त्या हरकतीची दखल न घेता बनावट कागदपत्राद्वारे तलाठी यांनी घेतलेली बेकायदेशीर नोंद प्रमाणित केली.
त्यानंतर कायदेशीर वारसदार रोहित तोरणगी यांनी त्यांचे कायदेशीर प्रतिनिधी बसवराज बगले यांच्या मार्फत अपिल केले.उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी सोलापूर यांनी सुनावणी घेऊन संबंधित कागदपत्रे तपासली आणी युक्तीवाद ऐकून तलाठी आणि मंडल अधिकारी यांच्या बेकायदेशीर नोंदीला स्थगिती दिली.
याशिवाय बसवराज बगले यांनी या प्रकरणी तलाठी आणि मंडल अधिकारी यांनी अनधिकृत महिलेशी संगनमत करून,खोटी आणि बनावट कागदपत्रे तयार करून शेतजमीन हडपण्यासाठी फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी.आणि खातेनिहाय चौकशी करून सेवेतून बडतर्फ करावे.अशी मागणी केली आहे.
त्यानुसार प्रांताधिकारी दिपक शिंदे यांनी सुलेरजवळगेचे तलाठी राहूल वाघमारे आणि करजगीचे मंडल अधिकारी मनोज गायकवाड यांना या गंभीर अपराधाबद्दल निलंबन आणि खातेनिहाय चौकशीची कारवाई का करू नये ? याचा खुलासा 48 तासाच्या आत करावा,अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
यामुळे बेकायदेशीर कामकाज करून शेतकरी आणि मिळकतदारांची लुबाडणूक करणारे महसूल कर्मचारी आणि तलाठी, सर्कल यांच्यात खळबळ उडाली आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

6 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

3 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago