एका जैन मुनींनी मंदिराच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील घाटकोपरमध्ये घडली आहे. गुरुवारी (दि. 20) पहाटेच्या सुमारास ही घटना समोर आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मनोहर लाल मुनी महाराज (वय 71) असे आत्महत्या केलेल्या मुनीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महाराजांचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पंतनगर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री मुनींनी मंदिरात गळफास घेतला होता. गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेतली.
मनोहर लाल मुनी महाराजांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. यात मुनींनी म्हटले आहे की, माझ्या स्वप्नात माझे गुरू आले होते. त्यांनी मला सांगितले की, या पृथ्वीवरचे तुझ काम संपले आहे. तू आता परत ये असे सुसाईडनोटमध्ये उल्लेख आहे. आम्ही सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…