ताज्याघडामोडी

SBI च्या सर्व ग्राहकांची UPI सह डिजिटल सेवा दोन दिवस राहणार बंद

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने देशभरातील आपल्या कोट्यावधी ग्राहकांसाठी गुरूवारी सूचना जारी केली आहे. यामध्ये बँकेची डिजिटल सेवा काही काळासाठी बंद राहण्याविषयी सांगितले गेले आहे. कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व खातेधारकांनी लवकर कामे उरकण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

21 ते 23 मे पर्यंत SBIच्या डिजिटल सेवा बंद

SBIने आपल्या अधिकृत ट्विटर हॅडलवरून माहिती दिली की, ग्राहकांना कोणत्याही तसदीविना डिजिटल सेवा उपलब्ध करून देण्यासाठी त्या अपडेट करण्यात येत आहेत. त्याकरीता 21 मे ला 10.45 PM ते 23 मे 1 AM पर्यंत संकेतस्थळ मेंटनन्ससाठी बंद असणार आहे. या दरम्यान ग्राहक INB/YONO/YONO Lite/UPI या सर्व्हिसेसचा वापर करू शकणार नाही.

SBI च्या ग्राहकांची UPI सेवा बंद

मेंटनन्सच्या कामादरम्यान, ग्राहकांना UPI सेवेच्या माध्यमातून व्यवहार करता येणार नाही. अशातच तुम्हाला कोणतेही व्यवहार करायचे असल्यास त्याआधी उरकून घेण्याचा सल्ला बँकेने दिला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

14 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

14 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago